Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: "मी जिंकली तर ट्रॉफी तूझ्या हातात.." बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीने सूरजशी लावली पैज

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीचा शो संपायला आता काही दिवस उरले आहेत. अशातच आता बिग बॉस मराठीची ट्रॉफी कोण जिंकणार अशी चर्चा सुरू आहे.

Manasvi Choudhary

'बिग बॉस' मराठीचे नवे पर्व संपायला थोडेच दिवस राहिले आहेत. घरातले सगळे सदस्य एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहेत. आजच्या 'UNSEEN UNDEKHA' मध्ये तुम्ही पाहू शकता, सूरज आणि निक्की गार्डन एरियात बसले असताना, सूरज निक्कीला अरबाजच्या नावाने चिडवत आहे.

सुरज निक्कीला म्हणाला,"तुझा घरामध्ये मूड नसतो कारण तुझा मुड घराच्या बाहेर गेला आहे. जर तुझा मूड समोर आला तर लगेच त्याला मिठी मारशील. त्याला बोलशील, माझे पिल्लू किती दिवसांतून आले मला भेटायला. तुला सारखी त्यांची आठवण येत असते. तो अजून तूझ्या डोक्यातून नाही गेला. त्यावर निक्की म्हणाली," असे काही नाही. मी अजिबात त्याच्या कडे जाणार नाही. मी उलट तूझ्याकडे येईन तू मला सांभाळ आणि त्याला बोल लांब राहा. मी त्याला माझ्या डोक्यातून कधीच काडून टाकले आहे.

सूरज यावर म्हणाला,"त्याला तू डोक्यातून काडून टाकशील पण तो हृदयातून नाही जाणार. तू आता बोलतेस की, मी नाही जाणार पण जर तू तुला म्हणाला, निक्की सॉरी. लगेच तू त्याला माफ करून गळ्यात पडशील. यावर निक्की म्हणाली," हा तुझा गैरसमज आहे. चल आपण पैज लावू. पैशाची नाही तुला जे हवे ते मी देईन. त्यावर सूरज म्हणाला," मला ट्रॉफी देणार का? त्यावर निक्की म्हणाली," हो, मी तुला आधीच म्हणाली की, मी जर जिंकली तर ट्रॉफी तूझ्या हातात देईन."

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT