Nikki Tamboli And Varsha Usgaonkar Fight Again Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5: 4 दिवसांपासून बिग बॉसच्या घरावर राज्य करणाऱ्या निक्की तांबोळीचा सूरज चव्हाणने आवाज केला बंद, VIDEO

Nikki Tamboli And Varsha Usgaonkar Fight Again :पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी बिग बॉसच्या घरावर राज्य करत आहे. या निक्की तांबोळीचा एका प्रश्नातच सूरज चव्हाणने आवाज बंद केला आहे.

Priya More

बिग बॉस मराठीचा ५ वा सीझनला नुकताच सुरूवात झाली. पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरामध्ये भांडणं, राडे पाहायला मिळत आहे. त्यामुळे बिग बॉस पाहायला प्रेक्षकांना चांगलेच आवडत आहे. अशामध्ये बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच निक्की तांबोळीने आपले रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी बिग बॉसच्या घरावर राज्य करत आहे. या निक्की तांबोळीचा एका प्रश्नातच सूरज चव्हाणने आवाज बंद केला आहे.

पहिल्या दिवसपासूनच निक्की तांबोळी ही वर्षा उसगांवकर यांच्यासोबत वाद घालत आहे. दोघींमध्ये छोट्या-मोठ्या कारणांवरून खटके उडत आहे. घरातील इतर सदस्य दोघींनी रोखण्याचा प्रयत्न करतात पण त्या कुणाचेच ऐकायला तयार नाहीत. बिग बॉसने घरातील जान्हवी सोडून इतर सदस्यांना बेड, सोफ्यावर बसण्यास मनाई केली होती. पण वर्षा उसगांवकरसह घरातील दोन सदस्यांनी हा नियम मोडला. त्यामुळे बिग बॉसने घरातील सदस्यांना जमिनीवर झोपण्यास आणि बसण्यास सांगितले.

वर्षा उसगांवर यांच्यामुळेच सर्वांना भोगावे लागत असल्याचे म्हणत निक्की तांबोळीने त्यांना टार्गेट केले. दोघीही जोरदार भांडण करू लागल्या. निक्की तांबोळी देखील तोंडाला येईल ते वर्षा उसगांवकर यांना बोलत आहे. या भांडणादरम्यान ती आरे तुरेवर आली. घरातील काही सदस्यांना निक्कीचे हे वागणं पटत नाही पण तिला कोणच काही बोलत नाही. निक्कीच्या या वागण्यावरून वर्षा उसगांवकर नाराज झाल्या आणि ते रडू लागल्या. तर दुसरीकडे निक्की देखील रडत होती. निक्कीने माफी मागितली पण तरी देखील ती वर्षा उसगांवकर यांना बोलण्याची एकही संधी सोडत नाहीये.

घरातील सर्व सदस्य डीनर टेबलजवळ बसले असता. सूरज चव्हाण निक्की तांबोळीला म्हणतो की ,'तू बेडवर बसली होती मी तुला बघितलं होतं. तू पूर्णपणे बेडवर बसली होती. त्यामुळे आपल्याला भोगावे लागत आहे.' यावर उत्तर देताना निक्की म्हणते की, खुर्चीवर बसायला परवानगी आहे. पण मी बेडवर चुकून बसली. त्यानंतर वर्षा उसगांवकर देखील तिला हेच सांगतात की मी देखील चुकून बेडवर बसली होती. त्यानंतर दोघींमध्ये पुन्हा वाद होतो. चूक कोणावर देखील होऊ शकते मी तुला दाखवून देते असे वर्षा उसगांवकर निक्कीला सांगतात.

बिग बॉसने शेअर केलेला प्रोमो व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत निक्कीलाच दोषी ठरवले आहे. 'निक्की तांबोळी दुसरी राखी सावंत आहे.', 'निक्की तांबोळी नुसती बडबड करत असते.', 'चोराच्या उलट्या बोंबा.', 'हिला मोठ्यांशी कसं बोलावं याची अक्कल नाही.', अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी सूरज चव्हाणचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT