Saurabh Chaughule Post On Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: '... कार्यक्रम पाहायचा की नाही?'; बिग बॉसमधील राडा पाहून योगिताचा नवरा सौरभ चौघुले संतापला

Saurabh Chaughule Post On Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कदरम्यान सदस्यांनी अपशब्द वापरले होते. त्यामुळेच अभिनेता सौरभ चौघुलेने नाराजी व्यक्त केली आहे.

Siddhi Hande

बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. या नवीन पर्वात अंकिता वालावकरकर, निक्की तांबोळी, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर सहभागी झाल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये योगिताने म्हत्त्वाची खेळी खेळली. त्यामुळे अंकिताच्या कॅप्टन्सीचा मार्ग मोकळा झाला. बिग बॉसच्या घरात योगिता चव्हाण ही खूप खंबीर सदस्य असल्याचे दिसत आहे.या टास्कदरम्यान घरातील अनेक सदस्यांनी चुकीची भाषा वापरली. त्यामुळे वर्षाताईंनी नाराजी दाखवली होती. त्यानंतर आता योगिताचा नवरा सौरभनेदेखील सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

'बिग बॉस'च्या घरात टास्कदरम्यान अनेक सदस्यांनी चुकीची भाषा वापरली होती. काहींनी अपशब्द वापरले होते, त्यामुळे सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे. बिग बॉसच्या सदस्यांना खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अशातच सौरभ चौघुलेने बिग बॉस हा कार्यक्रम बघायचा की नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. सौरभने सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट शेअर केली आहे.

योगिताचा नवरा सौरभ चौघुलेने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. लायकी, भीक अशी घाणेरडी भाषा वापरली जाते...खरंच हा कार्यक्रम कुटुंबासोबत पाहता येणारा आहे का?, असा प्रश्न सौरभने उपस्थित केला आहे.

यापूर्वीदेखील या कार्यक्रमावर खूप टीका झाली आहे. अनेक सेलिब्रिटींनी बिग बॉसच्या सदस्यांना सोशळ मीडियाच्या माध्यमातून सुनावले होते. वर्षा उसगावकर यांना घरात मिळालेल्या वागणुकीवर पुष्कर जोग,जय दुधाणे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसच्या बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांकडून धडाधड राजीनामे; शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली

Pimpri Chinchwad : मध्यरात्री कारवर बसून हुल्लडबाजी; तरुणांना जमिनीवर बसवून पोलिसांनी दिला चोप

Gold Price Hike: लक्ष्मीपुजनाच्या आधी सोनं महागलं तरी सराफ बाजारात झुंबड का? VIDEO

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Election: तिकीट मिळाले नाही म्हणून ढसाढसा रडले, कपडे फाडून रस्त्यावर लोळले; RJD नेत्याचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT