'बिग बॉस मराठी'चं नवीन पर्व नुकतंच सुरु झालं आहे. बिग बॉसच्या या नवीन सीझनमध्ये अनेक नवीन चेहरे सहभागी झाले आहे. बिग बॉसच्या घरात रोज भांडणे होताना दिसत आहेत. याच भांडणात कधीतरी प्रेम फुलतंय तर कोणाला भावना अनावर होताना दिसत आहेत. अशाच भावना घनश्याम दरवडेला झाल्या आहेत. बिग बॉसच्या नवीन भागामध्ये घनश्याम धनंजयजवळ आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. या भावना व्यक्त करत असताना त्याला अश्रू अनावर झालेले आहेत. (Bigg Boss Marathi New Promo)
कलर्स मराठीच्या पेजवर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये घनश्याम ढसाढसा रडताना दिसत आहे. पहिल्या दिवसापासून कोणासमोरही न झुकणारा, ठाम भूमिका घेणारा घनश्याम बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच रडताना दिसला आहे. घनश्याम धनंजयसोबत वाईट अनुभव शेअर करताना दिसत आहे. त्याला त्याच्या उंचीवरुन अनेकांनी कमी लेखलं होतं. हा अनुभव सांगताना घनश्यामला अश्रू अनावर झाले.
या नवीन प्रोमोत घनश्याम धनंजयसमोर आपलं मन मोकळं करताना दिसत आहे. तो म्हणतो की,, माझ्या आईवडिलांना लोकांनी खूप ऐकवलं. तुमच्या मुलाची उंची कम आहे, तो कधीच काहीच करु शकणार नाही,, असं म्हटलं होतं. ,परंतु आज तिच लोक माझ्या आईवडिलांना म्हणत असतील की, तुमचा पोरगा बिग बॉस सारख्या शोमध्ये दिसतोय,. हे बोलतानाच घनश्यामला अश्रू अनावर झाले.
यावेळी धनंजयने घनश्यामला समजावण्याता प्रयत्न केला. धनजंय म्हणाला की, 'ज्याला शरीराची उंची मापता आली नाही त्याला मनाची उंची काय मापता येणार?', बिग बॉसचा हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Ghanshyam Cries In Bigg Boss Marathi)
'बिग बॉस'च्या घरात गेल्या काही दिवसांपासून खूप भांडणे होताना दिसत आहे. नुकतीच अंकिता बिग बॉसची पहिली कॅप्टन झाली आहे. आता बिग बॉसच्या घरात पुढे काय बघायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.