Bigg Boss Marathi 4
Bigg Boss Marathi 4 Instagram @colorsmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या सर्व स्पर्धकांचा ग्रँड फिनालेमध्ये हॉटनेसचा तडका, या स्पर्धकांच्या डान्सने चाहते घायाळ...

Pooja Dange

Bigg Boss Marathi 4 Grand Finale: 'बिग बॉस मराठी ४' या पर्वाचा आजचा शेवटचा दिवस. आज पार पडणार आहे शोचा अंतिम सोहळा. १०० दिवसांच्या या प्रवासात सर्व स्पर्धकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता हे स्पर्धक त्यांच्या डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. अक्षय केळकर आणि किरण माने यांनी एकत्र 'डॉन' या गाण्यावर डान्स केला आहे. तर अमृता, राखी आणि अपूर्वाने देखील त्यांच्या डान्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहेत हे निश्चित.

कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर सर्व स्पर्धकांच्या डान्स ते व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये बिग बॉसच्या टॉप ५ स्पर्धांनी वेगवेगळे गेटअप करत दर्जेदार परफॉर्मन्स दिले आहे.

राखी सावंतने 'टिप टिप बारसा पानी' या गाण्यावर डान्स केला आहे. तर अमृता धोंगडे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटातील 'बिजली' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. अपूर्वा नेमळेकर 'मेरे ढोलना सून' या विद्या बालनच्या गाण्यावर परफॉर्म करत आहे. तर किरण माने आणि अक्षय केळकर एकमेकांना टशन देत 'डॉन' या गाण्यावर डान्स केला आहे.

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची तयारी बघता या अंतिम सोहळा खर्च खुप रंजक होणार आहे यात शंका नाही. या टॉप ५ स्पर्धकांसह या सोहळ्यात इतर स्पर्धक देखील त्यांच्या नृत्याने चार चांद लावणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संतापले

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT