Bigg Boss Marathi Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: अमृता धोंगडे आहे कोणावर नाराज? 'आय डोन्ट केअर' म्हणत महेश मांजरेकरांनी व्यक्त केला संताप

सुपर पॉवर असलेल्या किरण मानेंची घरामध्ये पुन्हा एन्ट्री झाली. त्यांच्या येण्याने घरातील सगळीच सूत्र बदलली.

Pooja Dange

Bigg Boss Marathi Latest Update: 'बिग बॉस मराठी 4' सुरू होऊन ५० दिवस उलटून गेले आहेत. या पन्नास दिवसात बिग बॉसच्या घरात अनेक बदल पाहायला मिळाले. मित्र शत्रू झाले आणि शत्रू असलेले मित्र झाले. बिग बॉसचा खेळ असाच आहे जिथे काहीही होते. आजही बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी अमृता धोंगडेला 'आय डोन्ट केअर' म्हणत चांगलेच सुनावले आहे.

'बिग बॉस मराठी'चा हा आठवडा सुद्धा चांगलाच गाजला. सुपर पॉवर असलेल्या किरण मानेंची घरामध्ये पुन्हा एन्ट्री झाली. त्यांच्या येण्याने घरातील सगळीच सूत्र बदलली. त्यांनी दिलेल्या रँकिंगमुळे अमृता धोंगडे चांगलीच नाराज झाली. त्यानंतर घरात वातावरण अजूनच बिघडले. घरामध्ये आधी हत्ती आणि मुंग्या हा टास्क झाला. त्यामध्ये अम्रुता धोंगडे हिने जेल तोडल्याने तिला बिग बॉसने शिक्षा केली.

या आठवड्यामध्ये 'बिग बॉस'ने जोड्या नेमून दिल्या होत्या. त्या जोड्यांनी एकत्र राहायचे होते. दरम्यान सगळ्या स्पर्धकांचे असे म्हणणं झाले की बिग बॉसने दिलेल्या या निर्णयामुळे सगळ्यांचे खरे चेहरे समोर आले. तेजस्विनी लोणारी हिला सगळ्यांनी टार्गेट केले. तेजस्विनी आणि प्रसादच्या जोडीला सगळ्यांनीच नावे ठेवली. अमृता धोंगडे सुद्धा यात मागे नव्हती. तिने तेजस्विनीविषयी अनेक गोष्टी अपूर्वा आणि टीमला सांगितल्या.

या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्क हा लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्यामध्ये पार पडला. रोहित आणि तेजस्विनी यांच्यामध्ये शेवटचा कॅप्टन्सी टास्क पार पडला. दोन्ही टीमला आपापल्या क्षेत्राचे रक्षण करून साखरेचे बॉक्स वाचवायचे असतात. या कार्याची संचालक अमृता धोंगडे असते. टास्कदरम्यान खूप भांडणे होतात. रोहित आणि विकासच्या कृत्यांमुळे बिग बॉस दोघांना जेलमध्ये टाकतात. इतके सगळे होऊनही या आठड्यात सुद्धा कोणीही घराचा कॅप्टन होत नाही. (Bigg Boss Marathi)

आजच्या चावडीवर महेश मांजरेकर अमृता धोंगडेला ओरडताना दिसत आहेत. ती तिच्या टीमशी लॉयल राहिली नाही म्हणून मांजरेकरांनी तिला खूप बोलले. महेश मांजरेकर अमृता धोंगडेला म्हणतात, 'मॅडम धोंगडेने तर उच्छाद मांडला आहे या आठवड्यात. तुला सातवा नंबर दिला याच राग नव्हता. तुला सगळ्यात जास्त राग त्याने तेजाला पहिला नंबर दिला याचा आला. ए टीमची लॉयलटी शिका त्यांच्याकडून.' अमृता महेश मांजरेकरांना यावर उत्तर देत म्हणते, 'जर फ्रंटल फक्त तेजस्विनी दिसतेय तर मला तो ग्रुप नाही ठेवायचा.' यावर महेश मांजरेकर तिला म्हणतात, आय डोन्ट केअर. (Mahesh Manjrekar)

टीम बीमध्ये दिवसेंदिवस अविश्वास वाढत आहे. आधी प्रसादामुळे टीम विभागली होती. तर आता अमृता धोंगडेने टीममधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात सुद्धा अमृताने तेजस्विनीमध्ये खूप वाद झाले होते. तेव्हाही महेश मांजरेकरांनी अमृताला धोंगडेचे कान टोचले होते. अमृताच्या या वागण्याने तिला काय सहन करावं लागणार हे आपल्याला येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT