Vikram Gokhale: विक्रम गोखलेंचा 'हा' राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट पाहिलात का? तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचा हा ट्रेलर पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
Vikram Gokhale Photo
Vikram Gokhale PhotoSaam Tv

Vikram Gokhale: शनिवारी दुपारी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. प्रदीर्घ आजारामुळे विक्रम गोखलेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात मागील १७ दिवसांपासून त्यांनी मृत्यूसोबत कडवी झुंज दिली पण आज अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गोखले यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन दुनियेत बऱ्याच भूमिका निभावल्या आहे.

Vikram Gokhale Photo
Vikram Gokhale: फक्त विक्रम गोखलेंसाठी अमिताभ बच्चन झळकले होते मराठी चित्रपटात, तुम्ही पाहिलाय का तो सिनेमा?

विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली वाहत आहेत. यादरम्यान त्यांचा एक खास व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचा हा ट्रेलर पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

Vikram Gokhale Photo
Vikram Gokhale Movies: माहेरची साडी ते गोदावरी, चाहत्यांच्या लक्षात राहिलेले विक्रम गोखले

विक्रम गोखलेंना २०१३ मध्ये 'अनुमती' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. २०१३ वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रम गोखलेंसह इरफान खान यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला होता.

विक्रम गोखलेंनी अनुमती चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनामनात कायमची घर करुन गेली. एका वडिलांचे मन मोठ्या पडद्यावर दाखवताना गोखलेंनी प्रेक्षकांच्या मनाच्या हळव्या कोपऱ्याला स्पर्श केला होता.

विक्रम गोखलेंनी आपल्या चंदेरी दुनियेतील कारकिर्दित तब्बल ५० हून अधिक चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिकाकरत प्रेक्षकांवर आपली छाप पाडली. पण अनुमती चित्रपटांतील विक्रम गोखलेंची भूमिका आज ही प्रेक्षकांना भावते. त्या चित्रपटात विक्रम गोखलेंसोबत रीमा लागू, नीना कुलकर्णी आणि सुबोध भावे यांनी प्रमुख भूमिका साकारली.

'अनुमती' चित्रपटाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार प्राप्त झाला होता तर. तर गोखलेंना 'अनुमती' चित्रपटातून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे मानकरी ठरले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com