Bigg Boss Today Special  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Season 4 : बिग बॉसच्या घरात रंगणार 'गरबा नाईट'; स्पर्धकांचा डान्स चर्चेत

काल सर्वच स्पर्धक गाण्यांवर थिरकत होते. तसेच नंतर गरबा नाईट्सचाही सर्व स्पर्धकांनी मनमुराद आनंद लूटला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या 'बिग बॉस ४' रिअॅलिटी शो ची वादळी सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घराचे दरवाजा उघडताच काही स्पर्धकांना नॉमिनेटही करण्यात आले होते. चौथ्या सीझनच्या स्पर्धकांना पहिले साप्ताहिक कार्य 'दे धडक- बेधडक' देण्यात आले होते. पहिल्याच आठवड्यात विविध रंजक गोष्टी घडल्याने स्पर्धकांसोबतच चाहत्यांच्याही लक्षात राहणारा हा सीझन ठरला आहे.

घरात जेवढा वादविवाद होतो तशीच धम्माल मस्ती काल बिग बॉसच्या घरात होताना आपण पाहिली. काल सर्वच स्पर्धक गाण्यांवर थिरकत होते. तसेच नंतर गरबा नाईट्सचाही सर्व स्पर्धकांनी मनमुराद आनंद लूटला. दरम्यान अपूर्वा आणि प्रसादमधील वाद चांगलाच विकोपाला गेला होता. संचालक असणाऱ्या दोघांचेही मत-मतांतर होत असल्याने काही साप्ताहिक कार्यातील उपकार्य अनिर्णित राहिले. त्यानंतर घरात पुढच्या उपकार्याला सुरुवात झाली. आजच्या कार्याचे किरण माने आणि निखील राजशिर्के संचालक होते.

आजच्या टास्कमध्ये अक्षय आणि प्रसादने नऊवारी परिधान लावणीवर थिरकले. त्यांच्या सादरीकरणाने शोमध्ये एकच हशा पिकला. स्पर्धक कोणकोणत्या गाण्यावर ठेका धरणार हे आज संध्याकाळीच कळणार आहे. तसेच आज स्पर्धकांच्या 'गरबा नाईट'मुळे सदस्य एकापेक्षा एक हटके कलाकृतीने आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करणार आहेत. मनोरंजन करतेवेळी सर्वांनीच डान्सचा आनंद लुटला.

या जल्लोषासोबतच सदस्यांना एक खास सरप्राईजही मिळणार आहे. नेमकं सरप्राईज काय आहे हे आज संध्याकाळी कळेल. सरप्राईज पाहण्यासाठी स्पर्धकांसोबत प्रेक्षतही आतूर आहेत.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tushar Apte : बलदापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा स्वीकृत नगरसेवक

Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Pooja Sawant Mangalsutra: मराठमोळा साज! हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग लांब मंगळसूत्राचे पॅटर्न

Yuzvendra And Dhanashree: डिव्होर्सनंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा येणार एकत्र; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

SCROLL FOR NEXT