मुंबई: बिग बॉस मराठीचे (Bigg Boss Marathi) चौथे पर्व सुरु झाल्यापासून चांगलेच वादळी ठरले आहे. कधी स्पर्धकांच्या भांडणामुळे तर कधी त्यांच्या नृत्याविष्काराने स्पर्धक चांगलेच चर्चेत आलेत. असे म्हणतात बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्यानंतर तो कलाकार चांगलाच चर्चेत येतो. बिग बॉसच्या घरात सर्वाधिक उत्सुकतेची गोष्ट असते ती म्हणजे चावडी. चौथ्या पर्वातील पहिलीच चावडी घरातील मुख्य सूत्रधार महेश मांजरेकर यांनी घेतली. (Marathi Entertainment News) (Marathi- Actors)
या चावडीत बऱ्याच स्पर्धकांवर त्यांनी टीकेचे बाण ही सोडले. त्यामुळे ते स्पर्धक बरेच चर्चेत आले आहे. गेल्या आठवड्यात अपूर्वा नेमळेकर, प्रसाद जवादे आणि निखिल राजेशिर्के यांच्यामुळे घरात चांगलेच वाद निर्माण झाले होते. त्याचेच निमित्त साधत महेश मांजरेकरांनी स्पर्धकांची खरडपट्टी काढली. सर्वात जास्त मांजरेकर अपूर्वा आणि प्रसाद यांच्यावर भडकले होते. बिग बॉसचे घर सर्वात जास्त अपूर्वामुळेच गाजले.
चावडीच्या निमित्ताने काल बिग बॉसच्या घरात या आठवड्यातील बॉटम 4 आणि टॉप 4 स्पर्धक समोर आले आहेत. हे ठरवण्यासाठी मांजरेकरांनी एक टास्क सगळ्या स्पर्धकांना दिला होता. या टास्कदरम्यान स्पर्धकांना त्यांच्यातीलच हिरो आणि झिरो स्पर्धक निवडायला सांगितले होते. ज्या स्पर्धकांना दोन्ही विभागांमध्ये जास्त मते मिळतील त्यानुसार टॉप आणि बॉटम स्पर्धक ठरणार होते. आता दोन्ही विभागात जास्त मतं मिळालेल्या स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.
या आठवड्यातील टॉप ४ स्पर्धकांमधील खेळाडूंची त्रिशूल, रोहित, अमृता आणि रुचिरा ही नावे आहेत. तर बॉटम ४ स्पर्धकांमध्ये किरण माने, अपूर्वा नेमळेकर, विकास आणि यशश्री यांची नावे आहेत. तर यामध्ये झिरो साठी सगळ्यात जास्त स्पर्धकांनी किरण मानेंना मत दिले आहे. आता बॉटम ४ स्पर्धकांपैकी एक स्पर्धक या आठवड्यात घराबाहेर जाणार आहे.
पहिल्याच चावडीमध्ये महेश मांजरेकरांनी स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. यातच आता घराबाहेर कोण जाणार त्याचा निर्णय बिग बॉस महेश मांजरेकर घेणार आहेत. यातच बाहेर जाणाऱ्या स्पर्धकांमध्ये अमृता देशमुख, यशश्री मसुरकर आणि किरण माने यांची नावं आहेत. आता बिग बॉसच्या घराबाहेर जाणारा पहिला स्पर्धक कोण ठरणार हे बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
Edit By: Chetan Bodke
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.