Utkarsh Shinde Uncle Dinkar Shinde Dies Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dinkar Shinde Dies : शिंदे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, गायक आनंद शिंदे यांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

Dinkar Shinde Passed Away : महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध करणाऱ्या शिंदे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Chetan Bodke

महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध करणाऱ्या शिंदे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांचा भाऊ दिनकर प्रल्हाद शिंदे यांचं बुधवारी पहाटे निधन झालं आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त बिग बॉस फेम अभिनेता उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिले आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये उत्कर्ष शिंदेने लिहिले की, "गायक-दिनकर प्रल्हाद शिंदे. महागायक प्रल्हाद शिंदेचे लहान चिरंजीव, आनंद आणि मिलिंद शिंदेंचे धाकटे भाऊ आणि विजया आनंद शिंदेंचे नात्याने जरी दीर तरीही मनात स्थान मात्र पहिल्या मुलाचे. हर्षद, उत्कर्ष आणि आदर्शचे दिनू नाना. काका कमी पण दोस्त जास्तं. नेहमी हसरा चेहरा, फुल ऑन एनर्जी, मस्त कलंदराच आयुष जगलेला एक मस्त कलाकार. मी नेहमी विजया आनंद शिंदे म्हणजे माझ्या मम्मीच्या तोंडून ह्या सर्वांचे लहान पनीचे किस्से ऐकले. "

"कसे हे सर्व मंगळवेढे गावात एकाच वाडीत समोर राहायचे, एकाच शाळेत शिकायचे. लहानपण कसं एकत्र गेले. कसं लहानपणीच मम्मी पप्पाचं लग्न झालं ? गावातून कल्याणचा प्रवास कसा झाला. गरिबी घरात होती पण ही लहान लहान मुलं किती पटापट जबाबदारीची जाण ठेवत अवेळी मोठी झाली. कसा शिंदेघराण्याचा डोलारा खांद्यावर एक एक जण घेऊ लागला. मोठा भाऊ म्हणजे बापच आणि वहिनी म्हणजे आई. हे तुमच्या कडून शिकलो दिनू नाना. भावाभावाने अजन्म एकत्रित कसं रहायचं ते तुमच्या कडून शिकलो. आज जेव्हा मी माझ्या पुतण्याना आल्हाद हर्षद शिंदे, अंतरा आदर्श शिंदे, आलाप हर्षद शिंदे ह्यांना खांद्यावर घेऊन मस्ती करतो तेव्हा आठवण येते तुम्हा सर्व काका लोकांची. कारण आम्हाला ही तुम्ही असेच खांद्यावर घेऊन वाढवलंत. तुम्हीही शिकवण दिलीत पुतणे म्हणजे मित्र आपले मुलंच."

"म्हणून आज आल्हाद मला नाना काका नाही तर मला भाई म्हणतो. शिंदे घराण्याने काय कमवलं असेल तर ते असतील नाती माणसे मित्र परिवार आणि प्रेक्षकवर्ग. मागच्या वर्षी आपला सार्थक आपल्याला सोडून गेला त्याच्या जाण्याचे दुःख तुम्ही पचवू शकला नाहीत .एका पित्याला हे दुःख पचविणे तसे अशक्यच. तरीही तुम्ही स्वतःशी ही झुंज दिलीत. नेहमी तुमच्या चेहऱ्यावर दिसलेली ऊर्जा, हास्य आम्हाला आयुष्याला भिडण्याची कला शिकवून गेला. भावाभावातल प्रेम, स्टेजवर तुम्ही एंट्री केली की वेगळाच कॉन्फिडन्स हे सगळं आम्ही मिस करू."

"तुम्हासर्वांच्या संस्कारामुळेच आज हर्षद, आदर्श आणि उत्कर्ष एकत्रित एकमेकांची ताकद बनून सोबत राहून पुढे ही असेच शिंदे घराण्याचा वट्टवृक्ष आणखी जास्त भव्य समृद्ध करू. तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वार्ता कळाली आणि तुमच्या सोबत घालविलेले लहानपणापासून ते आतापर्यंतचा प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला. दिनू नाना वि विल मिस यू."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

SCROLL FOR NEXT