बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवसंबंधित महत्वाची बातमी समोर येत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने राजपाल यादवची कोट्यवधींची मालमत्ता बँकेने जप्त केली आहे. अभिनेता राजपाल यादवने २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अता पता लापता' चित्रपटासाठी बँकेकडून ५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजपालने केले होते, तर चित्रपटाची निर्मिती त्याची पत्नी राधा यादव यांनी केली होती.
बँकेने अभिनेत्याची उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमधील संपत्ती जप्त केली आहे. अभिनेत्याने कर्जाची रक्कम वेळेवर न भरल्याने कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने मुंबईच्या बीकेसीमधील शाखेतून कर्ज घेतलं आहे. बँकेमध्ये राजपालने वडील नौरंग यादव यांच्या नावावर असलेली जमीन बँकेत तारण ठेवली होती. मात्र कर्ज घेतलेली रक्कम अभिनेत्याने न भरल्याने ही कारवाई केली. दोन दिवसांपूर्वीच बँकेच्या मुंबईतल्या शाखेतले कर्मचारी उत्तर प्रदेशमध्ये गेले होते.
२ दिवसांपूर्वीच राजपाल यादवची शाहजहांपूरमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. अभिनेत्याने कर्जाचा हफ्ता वेळेवर न भरल्यामुळे त्याची संपत्ती जप्त केली आहे. रविवारी राजपालच्या मालमत्तेवर बँकेचे बॅनर लावण्यात आले होते. ही मालमत्ता सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईची असून त्यावर कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री करू नये, असे त्यात लिहिले आहे. सोमवारी सकाळी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबईच्या अधिकाऱ्यांनी ही मालमत्ता गाठून ती ताब्यात घेतली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.