Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊच्या बिग बॉसचा नवा प्रोमो चर्चेत

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी सिझन ६ चा नवा प्रोमो रिलीज झाला असून “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार” या थीमने संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झाली आहे. ११ जानेवारीपासून कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टार वर पहा.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss Marathi: “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार टॅगलाईनसह बिग बॉस मराठी सिझन ६ चा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकतेची लाट निर्माण केली आहे. रितेश भाऊंच्या कडक अंदाजात सादर झालेल्या या प्रोमोमुळे यंदाचा सीझन केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता खेळाडूंचं नशीबच बदलणारा ठरणार, असा स्पष्ट इशारा मिळतोय.

बिग बॉस मराठीचा सहावा सीझन ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टार वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्याआधीच रिलीज झालेल्या या प्रोमोने चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. “फॅन्सचा जीव जडला की ते पाठ सोडत नाहीत… आणि आपण शब्द दिला की मागे हटत नाही,” अशा प्रभावी संवादांतून रितेश भाऊंनी या सिझनचा सूर ठरवून दिला आहे.

प्रोमोमधील मुख्य आकर्षण म्हणजे घराची भव्य आणि रहस्यमय रचना. शेकडो दारखिडक्यांनी सजलेलं घर, दारापल्याड दडलेली अनपेक्षित सरप्राइझेस आणि क्षणाक्षणाला बदलणारा खेळ – हे सगळं यंदाच्या थीमचं वैशिष्ट्य ठरणार आहे. प्रत्येक दार उघडलं की नवा ट्विस्ट समोर येणार असून कोण पास होणार आणि कोण फेल, हे एका क्षणात ठरू शकतं.

रितेश भाऊ प्रत्येक सीझनमध्ये प्रोमोमधून काहीतरी वेगळं सादर करत आले आहेत. कधी हटके लूक, कधी खास स्वॅग, तर कधी कोड्यातून सांगितलेली थीम – यंदाही त्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. “ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ,” या ओळी आधीच सोशल मीडियावर व्हायरल होण्याची चिन्हं दिसत आहेत.

घर कसं असेल, दारापलीकडे नक्की काय दडलंय, खेळाडूंना कोणते धक्के बसणार आणि कोणाचं नशीब फळफळणार हे सगळे प्रश्न सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठी सिझन ६ हा महाराष्ट्राला खिळवून ठेवणारा ठरणार, यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुप्त ठिकाणी बैठक, हातात बंद लिफाफे मनसे आणि ठाकरे गटात नेमकं काय घडतंय? VIDEO

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शनसेवा बंद

T20 World Cup : ३६ चेंडूंत १००, ८४ चेंडूंत १९० धावा; वैभव सूर्यवंशीला टी २० वर्ल्डकप संघात घ्या, दिग्गज खेळाडूची मागणी

Instant PAN Card : फक्त 5 मिनिटांत मिळणार पॅनकार्ड; सरकारची नवी झटपट सुविधा सुरू

Sangli : सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली १२००० झाडांची कत्तल, गावकऱ्यांना ठेवलं अंधारात

SCROLL FOR NEXT