Rajinikanth ShahRukh Khan Together: रजनीकांत आणि शाहरुख खान एकत्र दिसणार मोठ्या पडद्यावर; 'या' अभिनेत्याने दिली हिंट

Rajinikanth Shah Rukh Khan Together: भारतातील दोन सर्वात मोठे सुपरस्टार, रजनीकांत आणि शाहरुख खान यांना जेलर २ मध्ये एकत्र दिसू शकतात.याबद्दल मिथुन चक्रवर्ती यांनी मोठी हिंट दिली आहे.
Rajinikanth Shah Rukh Khan Together
Rajinikanth Shah Rukh Khan TogetherSaam Tv
Published On

Rajinikanth Shah Rukh Khan Together: रजनीकांत आणि शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील दोन सर्वात मोठे सुपरस्टार एकत्र दिसू शकतात. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी याबद्दल एक हिंट दिली आहे. ज्या चित्रपटात शाहरुख खान आणि रजनीकांत एकत्र दिसण्याची अपेक्षा आहे त्याचे नाव 'जेलर २' आहे. मिथुन चक्रवर्ती देखील या चित्रपटाचा भाग असतील. ते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.

शाहरुख खान आणि रजनीकांत एकत्र येणार आहेत

SITI सिनेमाला दिलेल्या एका खास मुलाखतीत मिथुन चक्रवर्ती यांनी जेलर २ बद्दल उत्साह व्यक्त केला. जेलर २ मधील त्यांच्या सह-कलाकारांची नावे सांगताना मिथुन म्हणाले, "मोहनलाल, शाहरुख खान, रम्या कृष्णन, शिवराजकुमार." मिथुन यांनी या चित्रपटासाठी शाहरुख खानचाही उल्लेख केला. ज्यामुळे चाहते खूप उत्सुक आहेत. जेलर २ हा रजनीकांतच्या २०२३ च्या जेलर चित्रपटाचा सिक्वेल आहे. तेव्हापासूनच शाहरुख आणि रजनीकांत एकत्र दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Rajinikanth Shah Rukh Khan Together
Pushkar Jog: 'माझं घर गेलं...'; मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुंबईतील फ्लॅटला लागली भीषण आग, थोडक्यात वाचला जीव

जर शाहरुख खान या चित्रपटात दिसला तर शाहरुख खान आणि रजनीकांत एकत्र स्क्रीन शेअर करण्याची ही दुसरी वेळ असेल. यापूर्वी रजनीकांत आणि शाहरुख खान २०११ च्या 'रा.वन' चित्रपटात एकत्र दिसले होते. रजनीकांत यांनी शाहरुख खानच्या चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती.

Rajinikanth Shah Rukh Khan Together
Coconut Truffles: न्यू इयर करा स्पेशल! लहान मुलांसाठी बनवा झटपट टेस्टी आणि हेल्दी नारळाचे ट्रफल; वाचा सोपी रेसिपी

जेलरबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रजनीकांत, मोहनलाल, जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन आणि योगी बाबू सारखे कलाकार होते. sacnilk.com नुसार, चित्रपटाचे बजेट २०० कोटी होते. हा चित्रपट सर्वकालीन ब्लॉकबस्टर होता. या चित्रपटाने भारतात ३४८.५५ कोटी आणि जगभरात ६०४.५ कोटींची कमाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com