संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती... आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. आज गांधीजींच्या जयंतीनिमित्त अनेक राजकारण्यांसह सेलिब्रिटींनीसुद्धा महात्मा गांधी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत आदरांजली वाहिली. नुकतंच टेलिव्हिजन अभिनेता किरण माने यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “...माणूस दिसायला हडकुळा होता, किरकोळ शरीरयष्टी, छातीचा पिंजरा दिसत होता, पण माझ्या भावा, त्या छातीत असा दम होता की आजबी अख्खं जग त्याला झुकून सलाम करतं! ही होती फक्त विचारांची ताकद. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, कोरीया... पृथ्वीवरच्या कुटल्याबी देशात जा...कुट्ट्टंबी... आज गांधीबाबाच्या विचारांनी प्रभावित झालेली, त्यांच्या पुतळ्यापुढं नतमस्तक झालेली माणसं भेटतील!”
पुढे किरण माने पोस्टमध्ये म्हणतात, “आपण कित्तीबी वरडुन बोललो- घसा फाडूफाडून बोललो, तरी आपल्या बोलण्यात 'सत्याचा अंश' नसलं तर जगाच्या बाजारात त्या बोलण्याला काही किंमत मिळत नसती... त्या महात्म्याचा आवाज खणखणीत नव्हता का चालण्यात रूबाब नव्हता. वाकून काठी टेकत- टेकत हजारो लोकांसमोर त्यो यायचा.. पालथी मांडी घालून बसायचा आन बसक्या आवाजात बोलत र्हायचा... आवाजात चढउतार नायत का टाळीबाज- चटपटीत वाक्य नायत... त्याच्या विचारात 'निर्मळ'पना व्हता- शब्दाशब्दात भारत मातेवरची माया व्हती- रक्ताच्या थेंबाथेंबात आपल्या मातीतल्या गोरगरीबांसाठीची आस व्हती- मानवतेची कास व्हती- 'सत्याची' ताकद व्हती..”
किरण माने पोस्टच्या शेवटच्या भागात म्हणतात, “गोळ्या घालून मारला बाबाला... पण तरीबी जित्ता र्हायला.. शत्रूच्या नाकावर टिच्चून. जगातला एकबी देश असा नाय जिथं त्याचा विचार पोचला नाय. खायचं काम नाय गड्याहो... ह्यांच्या हज्जार पिढ्या खपत्याल त्यो 'विचार' संपवायला पन 'गांधी' उसळी मारून वर येतच र्हानार. सलाम महात्म्या सलाम... कडकडीत सलाम..”
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.