Ankita Walawalkar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar Emotional Post: भाऊ नाही म्हणून...., 'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकरची रक्षाबंधनानिमित्त भावुक पोस्ट

Ankita Instagram Post: बिग बॉस मराठी' फेम 'कोकण हार्टेंड गर्ल' अंकिता वालावलकरने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. जी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Manasvi Choudhary

आज सर्वत्र रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. रक्षाबंधन या सणानिमित्त सर्वत्र आनंदी वातावरण आहे. आज बहिणी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून हा सण साजरा करतात. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच 'बिग बॉस मराठी' फेम 'कोकण हार्टेंड गर्ल' अंकिता वालावलकरने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. जी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अंकिता वालावलकर सध्या बिग बॉस मराठीमध्ये आहे. रक्षाबंधननिमित्त घरी नसल्याने अंकिताने भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलेय. अंकिताने, इन्स्टाग्रामवर दोन्ही बहिणींसोबतचा फोटो शेअर केला आहे. मॅचिंग ड्रेसमध्ये या तिंघी बहिणी फारच सुंदर दिसत आहे. पोस्टमध्ये अंकिताने, "आज रक्षाबंधन... लहानपणी भाऊ नाही म्हणून मांजरांना राखी बांधत मोठे झालो. गावात खूप आतमध्ये राहतो. त्यामुळे कोणी भाऊ असे रक्षाबंधनला आलेच नाहीत.

पुढे तिने, आपण खूप भांडतो. पण मी मोठी, म्हणून आई कायम मला सांगते लक्ष ठेव हा गं, बहिणी भांडतात पण विसरू नका हा एकमेकिंना. आज मी bigg boss मध्ये जरी असले तरी तुम्हाला miss करत असेन. तुम्हाला काही कमू पडू नये. अशी व्यवस्था करून आलेय. काळजी घ्या. ताईचे पैसे संपतील कसा ऑर्डर करू असा विचार करून मन मारून राहू नका. जे वाट्टेल ते मागवून खा, भांडू नका, रडू नका लवकरच येते. तुमची ताई अशी पोस्ट अंकिताने केली आहे.

अंकिताने पोस्ट शेअर करत आम्हाला भाऊ नाही. लहानपणापासून आम्ही तिंघी बहिणी रक्षाबंधन हा सण साजरा करतो. आज मी घरी नसल्याने मला तुमची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे. अंकिताच्या या पोस्टला सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर सध्या बिग बॉसच्या घरात आहे. आपल्या अभिनय आणि हटके स्टाईलमुळे अंकिता चांगलीच चर्चेत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT