Sakshi Sunil Jadhav
शेवंता हे पात्र गाजवणारी अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर हिची एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत काम करत आहे.
अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरची ही मालिका मात्र या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
प्रेमाची गोष्ट या मालिकेत ' सावनी हे खलनायिकेचं पात्र अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने साकारलं होते.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका २ वर्षांचा टप्पा पार करून निरोप घेत आहे.
अभिनेत्रीने पोस्ट मध्ये तिचा मालिकेतील २ वर्षांचा प्रवास तसेच शेवंताची भूमिका ते सानवी असा प्रवास सांगितला आहे.
नेटकऱ्यांनी अपुर्वांचे खूप कौतूक केले आणि ''तुम्हाला नव्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहोत''असे म्हणाले.