Bigg Boss Marathi 6  saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : टोळी फुटली; रुचिताचा खरा चेहरा रोशनसमोर आला, पाहा धक्कादायक VIDEO

Roshan Bhajankar Leave Toli Group : 'बिग बॉस मराठी 6' मध्ये नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. रुचिता आणि रोशनची मैत्री तुटते. रोशन 'टोळी' ग्रुप सोडतो. नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

रितेश भाऊ घरातील सदस्यांना एकमेकांनी केलेल्या चुगलींबद्दल सांगतात.

रोशन 'टोळी' हा ग्रुप सोडतो.

रोशनने 'टोळी' सोडल्यामुळे रुचिताला मोठा धक्का बसतो.

'बिग बॉस मराठी 6' मध्ये आज भाऊच्या धक्क्यावर घरातील एक सदस्य बाहेर जाणार आहे. या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, दीपाली सय्यद, रुचिता जामदार, राकेश बापट, सचिन कुमावत, अनुश्री माने, रोशन भजनकर आणि सागर कारंडे यांचा समावेश आहे. अशात आता बिग बॉसने नवीन प्रोमो शेअर केला आहे. जो पाहून प्रेक्षकांना खूपच आनंद झाला आहे.

नवीन प्रोमोमध्ये रितेश भाऊ आज भाऊच्या धक्क्यावर घरातील चुगलीचे दार उघडणार आहे. ज्यामुळे घरातील नाती बदलताना दिसणार आहे. घरातील सदस्यांना एक चांगला रिअ‍ॅलिटी चेक मिळणार आहे. रोशनने 'टोळी' ला रामराम ठोकला आहे. ज्यामुळे रुचिताला मोठा धक्का बसला आहे. नेमकं भाऊच्या धक्क्यावर आज काय घडणार, जाणून घेऊयात. 'टोळी' मध्ये विशाल, रुचिता, अनुश्री आणि रोशन हे सदस्य होते. आता रोशनने टोळी सोडली, अनुश्री विशालच्या विरोधात गेली. ज्यामुळे आता 'टोळी' रुचिता आणि विशाल उरले आहेत. एकंदर टोळी फुटली आहे.

व्हिडीओच्या सुरूवातीला पाहू शकता की, अनुश्री तन्वीला बोलते की, "मला विशालच्या विरोधात जायचे आहे..." हे पाहून विशाल म्हणतो की, "आपलेच दात आणि आपलेच ओठ..." त्यानंतर रुचिता विशालकडे चुगली करते की, "रोशन दादाला गेम कळत नाही एवढा..." त्यावर विशाल बोलतो की, "मला त्याचा भार घेऊन चालायचं नाहीये..." विशाल आणि रुचिताचे बोलणे ऐकून रोशन खूप दुखावतो. तो म्हणतो की, "कुठेतरी मन दुखलं माझं...मी ही टीम सोडतोय... आजपासून, आतापासून..."

या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. रुचिताचा खरा चेहरा रोशनसमोर आल्यामुळे प्रेक्षक भलतेच खुश आहेत. तसेच चाहते रोशनला पाठिंबा देताना दिसत आहे. आता 'टोळी'तून बाहेर पडल्यावर रोशनचा नवीन प्लान काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharat Case: ५८ नव्हे खरातचे १०० व्हिडिओ सापडले, SIT च्या तपासात धक्कादायक माहिती

Maharashtra Live News Update: शिर्डीत कॅप्टन अशोक खरात याच्या पत्नीच्या नावे आणखी एक मालमत्ता

Viral wedding video: नवऱ्याचा हटके स्टाइल पाहून लोक थक्क, लाईट्सच्या ड्रेसमुळे व्हिडिओ झाला व्हायरल

साताऱ्यात भाजपनं बाजी फिरवली, ZP चं अध्यक्ष अन् उपाध्यपद मिळवलं; शिंदेसेना अन् राष्ट्रवादीचे सदस्य फोडले|VIDEO

Indian Rupee: रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत निचांकी पातळीवर, भारतात महागाई वाढणार?

SCROLL FOR NEXT