Bigg Boss Marathi 6  saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसने 'या' सदस्यासाठी बंद केले दार; दीड महिन्यातच संपला प्रवास, रितेश भाऊंनी नाव घेताच सर्वांना बसला धक्का |VIDEO

Bigg Boss Marathi 6 - Eliminated Update : बिग बॉसच्या घरात या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी 4 सदस्य नॉमिनेट झाले आहे. कोणत्या सदस्याचा घरातील प्रवास थांबणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 6' सुरू होऊन दीड महिना झाला आहे.

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने तन्वीची शाळा घेतली.

या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी 4 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

'बिग बॉस मराठी 6' च्या घरात सातवा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात तन्वी कोलते घराची कॅप्टन असल्यामुळे ती नॉमिनेशन पासून सुरक्षित आहे. तर Power Key मिळाल्यामुळे प्रभू आणि अनुश्री देखील या आठवड्यात सुरक्षित आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये शेवटच्या क्षणी रुचिता टोळीच्या विरोधात जाते.

'बिग बॉस मराठी 6' च्या घरात सातवा आठवड्याचा भाऊचा धक्का चांगलाच गाजणार आहे. या आठवड्यात तन्वी कोलते घराची कॅप्टन असल्यामुळे ती नॉमिनेशन पासून सुरक्षित आहे. तर Power Key मिळाल्यामुळे प्रभू आणि अनुश्री देखील या आठवड्यात सुरक्षित आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये शेवटच्या क्षणी रुचिता टोळीच्या विरोधात जाते, ज्यामुळे घरात राडा पाहायला मिळतो. बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार, जाणून घेऊयात.

बिग बॉसच्या घरात 'नॉमिनेशनचा लगाम' हा टास्क पार पडला. या टास्कमध्ये राकेशने रोशनला, रुचिताने राकेशला, राखी सावंतने स्वतः ला आणि तन्वीने प्राजक्ताला नॉमिनेट केले. एकूणच या आठवड्यात चार सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. सातव्या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या यादीत रोशन भजनकर याचे नाव समोर आले आहे. रोशन घराबाहेर गेला तर प्रेक्षकांसोबतच घरातील सदस्यांना देखील मोठा धक्का बसेल. रोशनला महाराष्ट्रातून खूप पाठिंबा मिळत आहे. मात्र अद्याप रोशन घराबाहेर गेल्याची अधिकृत घोषणा झाली नाही.

सातव्या आठवड्यातील एलिमिनेशनमध्ये राखी सावंतचे नाव देखील पुढे आले आहे. या नावाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कारण राखी ही बिग बॉसच्या घरात पाहुणी कलाकार म्हणून आली होती. तिने तीन आठवडे घरात राडा घातला. त्यामुळे ती या आठवड्यात बाहेर जाऊ शकते, असे बोले जात आहे. या आठवड्यात रविवारी एलिमिनेशन न होता, शनिवारीच एका स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. त्यामुळे भाऊचा धक्का खूपच खास ठरणार आहे.

रितेश भाऊंनी घेतली तन्वीची शाळा

सातव्या आठवड्यात तन्वी कोलते घराची कॅप्टन होती. आठवडाभर बिग बॉसच्या घरावर तन्वीची सत्ता पाहायला मिळाली. तिच्या कॅप्टन्सीमध्ये राखी आणि तन्वीत खूप भांडणे झाली. आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख तिला चांगले खडेबोल सुनावणार आहे. आठवड्याभराच्या तिच्या चुकांचा पाढा रितेश भाऊ वाचणार. व्हिडीओमध्ये तन्वी कोलते खूप भावुक झालेली पाहायला मिळाली. तिच्या डोळ्यात अश्रू येतात.  'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

Onion: व्यापाऱ्यांचा कांदा खरेदीस नकार, कांदा उत्पादकांचं टेन्शन वाढलं

Diesel Crisis: 7/12 शिवाय डिझेल नाही, सरकारची जाचक अट; शेतकऱ्यांचा संताप

Imran Khan: इम्रान खानची पत्नी रिलेशनशिपमध्ये, जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत बांधणार लग्नगाठ

Fact Check : आता सर्वांना मिळणार 7500 रुपये पेंशन? सरकारकडून निवृत्तीवेतनात भरमसाठ वाढ?

SCROLL FOR NEXT