Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : "मी काय डंबल नाही..."; विशालने केली प्रभूची मस्करी, 'काळू डॉन' बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडला - VIDEO

Prabhu Shelke Crying In BB House : बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी प्रभू (काळू डॉन) ढसाढसा रडतो. विशाल प्रभूची मस्करी करतो. तेव्हा प्रभू आपल्या आजाराविषयी सांगतो.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात प्रभू शेळके आणि विशाल कोटियन यांच्यात भांडण होते.

विशाल प्रभूची उंचीवरून मस्करी करतो.

प्रभू शेळके 'काळू डॉन' म्हणून लोकप्रिय आहे.

'बिग बॉस मराठी ६' सुरू होताच घरात भांडणे व्हायला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांच्यात कडाक्याचे भांडण होते. त्यानंतर आता घरात प्रभू शेळके म्हणजेच सर्वांचा लाडका 'काळू डॉन' रडताना पाहायला मिळाला. ज्यामुळे नेटकरी चांगलेच भडकले आहेत. प्रभूची विशाल कोटियन खिल्ली उडवतो, त्यामुळे प्रभू भावुक होतो.

'बिग बॉस मराठी ६' ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विशाल प्रभूची उंचीवरून मस्करी करतो. जी प्रभूला अजिबात आवडत नाही. विशाल म्हणतो की, तर व्यायाम करताना डंबल कमी पडला तर याला डंबल म्हणून वापरता येईल. असे बोलून विशाल प्रभूला हाताला धरून उचलून घेतो. त्यावर प्रभू म्हणतो की, "मी काय डंबल नाही...मी तुम्हाला आताच सांगून ठेवतो... माझ्यासोबत अशी मस्करी करू नका... माझा हात मोडला आहे... आणि मला महिन्याला रक्त चढवावं लागतं..."

विशाल प्रभूला उत्तर देत म्हणतो की, "तू डॉन फक्त नावाने आहेस, मी कामाने डॉन आहे... मी दगडी चाळीतला मुलगा आहे." त्यानंतर प्रभू वॉशरुममध्ये जातो आणि देवीची प्रार्थना करतो. प्रभू व्हिडीओच्या शेवटी ढसाढसा रडताना दिसतो. त्यानंतर प्रभूला रोशन समजून सांगतो. प्रभू देखील आपले मन रोशनकडे मोकळे करतो.

दिवसाच्या शेवटी मात्र विशाल आणि प्रभू यांची भांडणे मिटतात. रात्री विशाल प्रभूशी बोलायला जातो. त्याच्या गावाविषयी बोलतो. विशाल बोलतो की, "तू खूप भारी आहेस. मला खूप आवडला. मी मस्तीमध्ये तुला उचलून घेतलं होतं. यापुढे त्रास देणार नाही..." त्यानंतर दोघे एकमेकांना मिठी मारतात. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओ हॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayaji Shinde Birthday : साऊथमध्ये डॅशिंग व्हिलन, मराठीत हुकमी एक्का; कोट्यवधींचे मालक असूनही सयाजी शिंदेंचे पाय जमिनीवरच

NHAI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी नोकरी; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती; पगार १.७७ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : नालासोप-यात मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी नेताना १० लाख ९ हजार रोख रक्कम पकडली

Alepak Recipe : हिवाळ्यासाठी खास आयुर्वेदिक आलेपाक कसा बनवावा? जाणून घ्या रेसिपी

Face Yoga Poses: डबल चिनमुळे चेहरा मोठा दिसतोय? मग घरीच करा रोज हे 5 फेस योगा प्रकार

SCROLL FOR NEXT