जमीन फाडून निघाला लाव्हा? जमिनीतून लाव्हा निघाल्याने नागरिक दहशतीत?

Truth Behind Viral Lava Video: आम्ही व्हायरल व्हिडिओंची पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो...आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय...त्यात दावा केलाय की नाशिकमध्ये लाव्हा जमिनीतून बाहेर आलाय...पण, खरंच नाशिकमध्ये जमिनीतून लाव्हा बाहेर आला का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..
Molten-like substance seen near an electricity pole in Malegaon triggered lava eruption rumours; investigation confirms technical fault.
Molten-like substance seen near an electricity pole in Malegaon triggered lava eruption rumours; investigation confirms technical fault.Saam Tv
Published On

...हा काळ्या रंगाचा पदार्थ जमिनीतून बाहेर आलाय...एवढ्या मोठ्या प्रमाणात लाव्हासारखा हा पदार्थ जमिनीतून बाहेर आल्याने एकच खळबळ उडालीय...जमिनीतून हे नक्की काय बाहेर आलं...नाशिकच्या मालेगावात लाव्हा जमिनीतून बाहेर आलाय का..? हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय...त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे...पण, व्हिडिओत दिसतोय तो लाव्हा आहे का...? याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला...

...नाशिकच्या मालेगाव जवळील सायने शिवारात

लाव्हाचा उद्रेक झाल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...एका मोकळ्या भूखंडजवळील हायव्होल्टेज विद्युत खांबा खालील जमिनीतून मोठ्या प्रमाणात लाव्हा सदृश्य पदार्थ बाहेर पडाला...लाव्हा असेल तर हे गंभीर आहे...कारण, लाव्हामुळे शेत जमिनीचं नुकसान होऊ शकतं...सुपीक जमीन आणि पिके लाव्हाखाली गाडली जातात...तसंच आरोग्यावरही परिणाम होतो...त्यामुळे नक्की हा पदार्थ काय आहे...? लाव्हाच आहे का...? हे जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली...

तर याबाबत आमच्या टीमने काही अधिकाऱ्यांशीही चर्चा केली...आणि हे नक्की काय आहे...? हा लाव्हा आहे का...? याची सत्यता जाणून घेतली...

बाईट-ज्योती देवरे-तहसीलदार मालेगाव

त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

विद्युत आर्थिंग तारेचं सप्लाय जमिनीतून गेलं

हिटिंगमुळे जमिनीतील धातू विरघळून बाहेर पडला

नाशिक जिल्ह्यात कुठेही लाव्हा प्रवणक्षेत्र नाही

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

दरम्यान एमपीसीएलच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत संपूर्ण वाहणारा पदार्थ बाजूला केलाय....आता विद्युत पोलचे काम सुरू करण्यात आलंय...तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलंय...त्यामुळे आमच्या पडताळणीत नाशिकमध्ये जमीन फाडून लाव्हा निघाल्याचा दावा असत्य ठरलाय...अजय सोनावणे साम टीव्ही मालेगाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com