इराण अमेरिकेचे मनसुबे धुळीत मिळवणार? इराण अमेरिकेची दाणादाण उडवणार? मोठा प्लॅन समोर

Middle East Tensions Escalate: अमेरिकेनं इराणवर विध्वसंक असा हल्ला केलाय.... मात्र या हल्ल्यानंतरही अमेरिकेने मनसुबे पूर्ण होणार का? असा सवाल उपस्थित होतोय... अमेरिकेचे नेमके काय मनसुबे होते? आणि इराण अमेरिकेची कशी दाणादाण उडवणार?
Iran strengthens military response after US-led strikes escalate tensions across the Middle East
Iran strengthens military response after US-led strikes escalate tensions across the Middle EastSaam Tv
Published On

अमेरिकेनं ऑपरेशन एपिक फ्युरी आणि इस्त्रायलनं ऑपरेशन लायन्स राबवून इराणविरोधात युद्ध छेडलंय.. या युद्धात आता ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनीही उडी घेत इराणला घेरण्याची रणनीती आखलीय... मात्र इराण अमेरिका, इस्त्रायल आणि नाटो देशांनाही जुमानायला तयार नाही.. अमेरिकेनं खोड काढल्यामुळे आता इराणने फक्त इस्त्रायलच नाही तर आपला मोर्चा अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या देशांकडेही वळवलाय...

इराणने आतापर्यंत मध्य पूर्वेतील अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या कुवैतमधील कॅम्प अरिफजानसह आणखी तीन एअरबेसवर विध्वंसक हल्ले केलेत...

बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळाच्या मुख्यालयावरही इराणने जोरदार हल्ले केलेत...

एवढंच नाही तर कतारच्या अल उदेद लष्करी तळावर इराणने क्षेपणास्त्र डागलेत...

युएईच्या आबू धाबीतील अल धफ्रा हे अमेरिकेचं लष्करी तळही इराणने लक्ष्य केलंय..

इराणने इराकमधील कुर्दीस्तान आणि पश्चिमी इराकच्या लष्करी तळावर भीषण हल्ले केलेत...

एवढंच नाही तर सौदी अरेबियामधील रियाध आणि जॉर्डन आणि ओमानमधील अमेरिकेचे लष्करी तळ उध्वस्त केलेत...

आता फक्त अमेरिका, इस्त्रायलच नाही तर मध्य पूर्वेतील कतार, कुवैत, बहरीन, ओमान, युएई, सौदी अरेबिया, जॉर्डन, इराक हे देशही इराणविरोधात युद्धाचं रणशिंग वाजवण्याची शक्यता आहे.... मात्र त्यानंतरही इराण सगळ्याच देशांना त्वेषानं उत्तर देणार हे आता स्पष्ट झालंय...

खरंतर पहिल्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलने इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी आणि 48 टॉप कमांडरची हत्या केली... खामेनींच्या हत्येमुळे इराणी लष्कराचं खच्चीकरण होईल, असे अमेरिकेचे आडाखे होते.. मात्र खामेनींच्या हत्येनंतर 2 दिवस उलटून गेले तरी इराण काही गुडघे टेकायला तयार नाही...याउलट इराणनेच अमेरिकेची अण्वस्त्रसज्ज युद्धनौका युएसएस अब्राहम लिंकनवर जोरदार मिसाईल हल्ला करुन अमेरिकेचं कंबरडं मोडण्याचा प्रयत्न केलाय... अमेरिकेनं हा दावा फेटाळून लावला असला तरी आता इराणने इस्त्रायल आणि अमेरिकेची दाणादाण उडवण्याची योजना आखलीय... होय... इराणने बंकरमध्ये ठेवलेले मिसाईल आणि ड्रोनचे व्हिडीओच जारी केलेत...

खरं तर आतापर्यंत अमेरिकेनं मध्य पूर्वेतील इराक, लिबियापासून अनेक देशांमध्ये तख्तापालट घडवून आणलेत.. मात्र इराण यापेक्षा वेगळाय... इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनींच्या हत्येनंतर इराणमध्ये अनागोंदी माजेल... आणि त्याचा फायदा घेत इराणमध्ये तख्तापालट करुन रझा पहेलवींच्या हाती सत्तेची सुत्रं देण्याची योजना होती.. मात्र अमेरिकेचे मनसुबे धुळीत मिळण्याची शक्यता आहे...कारण इराणच्या सर्वोच्च नेत्याची हत्या झाली तरी प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी राष्ट्राध्यक्ष असतो.. आता इराणी जनता, लष्कर आणि प्रशासन त्वेषानं अमेरिकेचे हल्ले परतवून लावत असल्यानं अमेरिकेचे मनसुबे अपूर्णच राहण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com