Manasvi Choudhary
प्रत्येकाला वाटते की बारीक असावे फिट असावं यासाठी वजन कमी करणे हेच कारण नाही तर तुम्ही दिनचर्येत नेमकं काय करता हे देखील महत्वाचे आहे.
तुम्ही रोज सकाळी फक्त २०-३० मिनिटे व्यायाम केल्याने शरीराला फायदा होतो.
सकाळी दोरी उड्या मारल्याने संपूर्ण शरीराची हालचाल होते. कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
एकाच जागी उभे राहून आपले गुडघे छातीपर्यंत वेगाने वर-खाली करणे. यामुळे तुमचे 'मेटाबॉलिजम' वाढते आणि पोटाचा खालचा भाग कमी होण्यास मदत होते.
पोटावर झोपून कोपरांच्या साहाय्याने शरीर जमिनीच्या समांतर वर धरा यामुळे तुमचे पोटाचे स्नायू घट्ट होतात आणि कंबर सुडौल दिसते.
दोन्ही पाय आणि हात पसरून उडी मारणे. हा व्यायाम संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण सुधारतो आणि शरीराला एक सुंदर आकार देतो.
सकाळी सूर्यनमस्कार केल्याने शरीरातील लवचिकता वाढते आणि प्रत्येक स्नायू टोन होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.