Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : डॉनची घरातून Exit; टॉप १० मध्ये येऊन सुद्धा शेवटच्या क्षणी ट्रॉफी हुकली, प्रभू झाला भावुक | VIDEO

Prabhu Shelke Eliminated From BB House : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातून प्रभू शेळके बाहेर पडला आहे. घरात १०व्या आठवड्यातील पहिले एलिमिनेशन पार पडले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी ६' च्या घरात सध्या १० वा आठवडा सुरू आहे.

घरातून प्रभू शेळके बाहेर पडला आहे.

या आठवड्यात डबल एलिमिनेशन होणार आहे.

बिग बॉसच्या घरात 11 वा आठवडा सुरू आहे. बिग बॉस आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. या आठवड्यात घरात डबल एलिमिनेशन होणार आहे. डबल एलिमिनेशनमध्ये काल भाऊच्या धक्क्यावर प्रभू शेळकेने घराचा निरोप घेतला. प्रभूच्या एक्झिटने तन्वीला खूप वाईट वाटले. तन्वी आणि घरातील इतर सदस्य देखील खूप भावुक झाले. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले होते.

नॉमिनेट झालेले सदस्य

  • दिपाली सय्यद

  • प्रभू शेळके

  • राकेश बापट

  • रेवा कौरासे

  • अनुश्री माने

  • सागर कारंडे

  • संकेत पाठक

शेवटी Danger झोनमध्ये रेवा कौरासे आणि प्रभू शेळके उरतात. त्यातून प्रभू एलिमिनेट होतो. प्रभू शेळकेने बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर प्रेक्षकांचे आभार मानले. तो म्हणाला की, "महाराष्ट्राने इतके प्रेम केले, पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार...स्वप्न होत की ट्रॉफी घरी घेऊन जायचे, पण ते पूर्ण झाले नाही. मी येथे आलो माझ्या फॅमिलीचे एक स्वप्न पूर्ण केले हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे..."

प्रभू शेळके कोण?

प्रभू शेळके हा जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या छोट्याशा गावातील राहणारा मुलगा. तो सोशल मीडियावर 'काळू डॉन' म्हणून लोकप्रिय आहे. प्रभू शेळके प्रसिद्ध रील स्टार आहे. आपल्या कॉमेडी आणि अभिनय शैलीने तो लोकांचे भरपूर मनोरंजन करतो. प्रभू शेळके यांनी बिग बॉसच्या घरात सांगितले की, दर महिन्याला माझे रक्त बदलावे लागते. रक्त बदलण्यासाठी तीन तास लागतात. उपचारांसाठी आईवडिलांनी वावर विकले. प्रभू शेळकेला गेल्या आठ वर्षांपासून 'थॅलेसेमिया' हा आजार आहे. "या आजारात शरीरातील रक्तपेशी नष्ट होत असतात, त्यामुळे दर महिन्याला मला रक्त बदलावे लागते... " असे प्रभू म्हणाला. बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री करताना त्याने शॉर्टकटचा मार्ग न निवडता मेहनतीचा मार्ग निवडला.

आता प्रभू शेळके नंतर बिग डबल एलिमिनेशनमध्ये बिग बॉसच्या घरातून कोणाचा पत्ता कट होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोशल मीडियावर संकेत पाठकच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. याचा खुलासा आता आज रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावर करतील. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT