Bigg Boss Marathi 6 Saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6: जुने स्पर्धक येणार नवं टास्क घेऊन; बिग बॉस मराठी 6 मध्ये मेघा धाडे-पुष्कर जोग आणि शिव ठाकरेची एंट्री

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी 6 मध्ये मेघा धाडे आणि पुष्कर जोगची गेस्ट एंट्री होणार आहे. प्रोमो व्हायरल झाला असून शिव ठाकरेच्या भावनिक पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’ सध्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना शोमध्ये एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या नव्या प्रोमोमध्ये जुन्या सीझनमधील लोकप्रिय स्पर्धकांची एंट्री दाखवण्यात आली आहे.

या प्रोमोमध्ये बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमधील विजेती मेघा धाडे आणि स्पर्धक पुष्कर जोग तसेच बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता शिव ठाकरे हे गेस्ट म्हणून घरात प्रवेश करताना दिसत आहेत. कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

“बिग बॉसच्या घरात होणार सीझन वनच्या धुरंधर स्पर्धकांची एन्ट्री मेघा धाडे आणि पुष्कर जोग येणार, घरात मजा मस्ती आणि धमाल रंगणार,” असे कॅप्शन या प्रोमोला देण्यात आले आहे. या एंट्रीमुळे घरातील वातावरण अधिक रंगतदार होणार असल्याची चिन्हे आहेत.

तेसच शिव ठाकरेची देखील यावेळी खास एन्ट्री झाली. त्याने आल्यावर बिग बॉससोबत गप्पा मारायला सुरुवात केल्या. बिग बॉसचा लाडका मुलगा शिव ठाकरे सदस्यांना भेटायला येणार... माहोल Emotional होणार! असे कॅप्शन त्याच्या प्रोमोला देण्यात आले आहे. यावेळी या तिघांनी टॉप ५ मध्ये असलेल्या राकेश बापट, अनुश्री माने, तन्वी कोलते, विशाल कोटियन आणि दीपाली सय्यद यांना काही सल्ले दिले आहेत.

शोच्या अंतिम टप्प्यात अशा प्रकारच्या गेस्ट एंट्रीजमुळे स्पर्धकांमध्ये नवी ऊर्जा येते आणि गेममध्ये नवीन ट्विस्ट निर्माण होतात. त्यामुळे आगामी भाग अधिक मनोरंजक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.‘बिग बॉस मराठी 6’चा प्रवास आता शेवटाकडे झुकत असताना, अशा सरप्राईज एंट्रीजमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण हे विजेते स्पर्धक आपल्यासोबत एक टास्क प्रत्येक स्पर्धकासाठी घेऊन आले आहेत. आता या गेस्ट्सच्या आगमनामुळे घरातील समीकरणे कशी बदलतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT