Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : श्रेयस तळपदे ते दीपाली सय्यद 'बिग बॉस मराठी ६'मध्ये कोण कोण झळकणार? भाऊच्या धक्क्यासाठी रितेश देशमुख सज्ज

Bigg Boss Marathi 6-Contestant List : 'बिग बॉस मराठी 6'च्या ग्रँड प्रीमियरची झलक समोर आली आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोण कोण दिसणार जाणून घेऊयात. 'ही' नावे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहेत.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 6' चा ग्रँड प्रीमियर 11 जानेवारीला पार पडणार आहे.

'बिग बॉस मराठी 6' रितेश भाऊ होस्ट करणार आहे.

'बिग बॉस मराठी 6' मध्ये 16 हून अधिक स्पर्धक झळकणार आहे.

'बिग बॉस मराठी 6' काही दिवसांत सुरू होणार आहे. 11 जानेवारीला या धमाकेदार शोचा ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे. याचा खास प्रोमो समोर आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून 'बिग बॉस मराठी 6' ची तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. या शोचे होस्टिंग रितेश भाऊ करणार आहे. त्यामुळे प्रेक्षक भलतेच खुश आहेत. यंदाच्या सीझनची थीम 'स्वर्ग आणि नर्क' अशी असणार आहे. या सीझन मध्ये कोण कोण झळकणार याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

ग्रँड प्रीमियरच्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रितेश भाऊंची ग्रँड एन्ट्री होते. रितेश देशमुख म्हणतो की,"मागचा सीझन वाजवलाय यंदाचा गाजवायचाय..." या प्रोमोवर प्रेक्षकांकडून भरभरून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या सीझनमध्ये 16 हून अधिक कलाकार झळकणार असल्याचे बोले जात आहे. बिग बॉसचे भव्य घर पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच शो 100 दिवसांचा असणार असल्याचे बोले जात आहे.

प्रोमोला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. त्यांनी लिहिलं की, "महाराष्ट्राचं तुफान येणार...ग्रँड प्रीमियरचा रंगतदार सोहळा रंगणार... बिग बॉस मराठीचं दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!" 'बिग बॉस मराठी 6' पाहण्यासाठी चाहते आता खूपच उत्सुक आहेत. 'बिग बॉस मराठी 6' चा ग्रँड प्रीमियर 11 जानेवारी रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी 6' मध्ये कोण कोण झळकणार यांची संभाव्य यादी पाहा

  • सागर कारंडे

  • दीपाली सय्यद

  • अनुश्री माने

  • संकेत पाठक

  • राधा मुंबईकर

  • रसिका जमसुतकर

  • श्रेयस तळपदे

  • राकेश बापट

  • काजल काटे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hrithik Roshan Birthday : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत स्टार किडची संपत्ती किती? जगतोय लग्जरी लाइफस्टाइल

BMC ELection : 'व्होट बँक' की शहरावर कब्जा? मुंबईची लोकसंख्याशास्त्रीय ओळख पुसण्याचा डाव

Kitchen Hacks : भाजीसाठी लागणारे वाटण जास्त काळ ताजे कसे ठेवावे? जाणून घ्या टिप्स

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT