Bigg Boss Marathi 6 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : थेट घराबाहेर पडणार 'हा' सदस्य, टॉप ५ च्या शर्यतीतून विजेतेपदाचा तगडा स्पर्धक OUT

BBM 6 Grand Finale First Elimination :'बिग बॉस मराठी ६' चा ग्रँड फिनाले काही तासांवर येऊन ठेपला आहे. बिग बॉसच्या घरातून सर्वात तगडा स्पर्धक बाहेर पडणार आहे.

Shreya Maskar

बिग बॉसचा ग्रँड फिनाले १९ एप्रिलला पार पडेल.

'बिग बॉस मराठी ६' मधून विजेतेपदाचा तगडा स्पर्धक बाहेर पडणार आहे.

स्पर्धक रितेश भाऊंनी दिलेली ऑफर स्वीकारतो.

'बिग बॉस मराठी ६' चा १०० दिवसांचा प्रवास आज अखेर संपणार. या सीझनमध्ये कोणाच्या नशिबाचे दार उघडणार आणि कोण 'बिग बॉस मराठी ६' ट्रॉफी उचलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. 'बिग बॉस मराठी ६' आपल्या होस्टिंगने रितेश भाऊंनी खूप गाजवला. प्रेक्षक उत्सुकतेने भाऊच्या धक्क्याच्या वाट पाहायचे. 'बिग बॉस मराठी ६' च्या विजेत्याची चर्चा सुरू असताना अशात मोठी अपडेट समोर आली आहे. घरातील सर्वात स्ट्राँग स्पर्धक बाहेर पडणार आहे.

टॉप-५ फायनलिस्ट कोण?

  1. तन्वी कोलते

  2. राकेश बापट

  3. अनुश्री माने

  4. विशाल कोटियन

  5. दिपाली सय्यद

'बिग बॉस मराठी ६' च्या ग्रँड फिनालेचे पहिले एलिमिनेशन

बिग बॉसने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ग्रँड फिनालेचे पहिले एलिमिनेशन होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सदस्यांना बज्जर वाजवून स्वतःला एलिमिनेट करायचे असते. जो स्पर्धक एलिमिनेट होईल त्याला तब्बल ५ लाख रुपये मिळतील. व्हिडीओच्या शेवटी बिग बॉसच्या घरातील Gentleman राकेश बापट बज्जर वाजवण्यासाठी पुढे येताना दिसतो. जे पाहून सोहळ्याला उपस्थित असलेल्या इतर सर्व सदस्यांना मोठा धक्का बसतो. राखी सावंत तर राकेश बापटकडे पाहतच राहते तिला मोठा धक्का राहतो. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

बिग बॉसने शेअर केलेल्या या व्हिडीओला त्यांनी हटके कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "Grand Finale चं पहिलं Eviction होणार... Buzzer दाबून रितेश भाऊंची ऑफर कोण स्वीकारणार? " या व्हिडीओवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहे. चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, कारण राकेश बापट हा विजेते पदासाठी तगडा स्पर्धक होता. त्याच्या नावाची तुफान चर्चा पाहायला मिळाली. तो पहिल्या दिवसापासून बिनधास्त खेळताना दिसला. राकेश बापट 'काटा' गटाचा सदस्य होता. बिग बॉसच्या घरात त्याचे आणि राखीचे खास नाते पाहायला मिळाले. तर तन्वी कोलतेला तो बहीण मानतो. दिपाली सय्यदचा तो चांगला मित्र आहे.

'बिग बॉस मराठी ६' चा विजेता कोण होणार?

मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस मराठी ६’ च्या विजेत्याला चमकदार ट्रॉफीसोबत तब्बल 15 लाख रुपयांची प्राइज मनी मिळणार आहे.‘टास्क क्वीन’ तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी जिंकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तन्वीनंतर अनुश्री माने आणि विशाल कोटियनचे नाव चर्चेत पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. विजेत्याचे नाव रितेश भाऊच ग्रँड फिनालेला घोषित करतील.

ग्रँड फिनाले कुठे अन् कधी पाहता येणार?

‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनाले 19 एप्रिल 2026 ला म्हणजेच येणाऱ्या रविवारी (अक्षय तृतीया) पार पडणार आहे. ग्रँड फिनाले रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT