Roshan Bhajankar Love Story Saam tv
मनोरंजन बातम्या

Love Story: मुलगा हमाली करतो म्हणून नकार,आज आहे सुखी संसार; अशी आहे बिग बॉस फेम रोशन भजनकरची फिल्मी लव्हस्टोरी

Roshan Bhajankar Love Story: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरू झाला आहे. बिग बॉसमध्ये रोशन भजनकरने त्याची जबरदस्त लव्हस्टोरी सांगून प्रेक्षकांना थक्क केले आहे.

Shruti Vilas Kadam

Roshan Bhajankar Love Story:  बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरू झाला आहे. पहिल्या दिवसापासूनच या घरात काही ना काही गोष्टी घडताना दिसत आहे. स्पर्धकांमध्ये जाेरदार वाद देखीलभांडणे होत आहेत. या स्पर्धकांपैकी एक रोशन भजनकरने त्याची जबरदस्त लव्हस्टोरी सांगून प्रेक्षकांना थक्क केले आहे. रोशन अमरावतीचा रहिवासी असून पूर्वी हमालीचे काम करत होता आणि आता बॉडीबिल्डर तसेच सोशल मीडिया इंस्टाफ्लुएंसर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच्या आयुष्यातील ही त्याची संघर्षमय पण प्रेरणादायी प्रेमकथा त्यांने शोमध्ये सांगितली आहे.

रोशनने सांगितले की त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या प्रेमाला सुरुच्याच काळात मोठा अडथळा आला होता. जेव्हा तो हमालीचे काम करत होते, तेव्हा त्यांच्या पत्नीच्या कुटुंबाने तो हमाली करतो या कारणासाठी लग्नाला नकार दिला होता. रोशन आणि त्यांच्या पत्नीमधील प्रेम अतूट असून, रोशनने त्या सर्व विरोधांना सामोरे जाऊन प्रेमासाठी संघर्ष केला.

बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर टीव्हीवर रोशनला पाहून त्यांची पत्नी भावूक झाली होती आणि त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यातून त्यांच्या प्रेमाची गहराई स्पष्टपणे दिसते. रोशनच्या दोन मुली आहेत आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही ठिक आहे. पण, त्यावेळी त्याने सिमेंटची पोती उचलण्याचे कष्टाचे काम देखील केले आहे.

शोमध्ये रोशनचा प्रवास विविध टास्क, नॉमिनेशन्स आणिhouse dynamicsमधील संघर्षांसह पाहायला मिळतो. ज्यात कुटुंबीयांबद्दल बोलताना त्याचे भावनिक क्षण प्रेक्षकांना भावले आहेत. रोशनचा अनुभव आणि संघर्ष ही फक्त त्याची वैयक्तिक कथा नाही तर त्याने आपल्या धाडसाने आणि चिकाटीने प्रेमासाठी केलेला संघर्ष देखील प्रेक्षकांसमोर आणला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Thombre: 'तुमच्या बापाची मक्तेदारी नाही! आधी मतमोजणी केंद्राच्या जाळीवर चढल्या नंतर पोलिसांवर भडकल्या, रुपाली ठोंबरे पाटलांचा पुण्यात राडा

BMC Election Result: प्रसिद्ध अभिनेत्री झाली मुंबईची नगरसेवक; ठाकरेंच्या उमेदवाराला चारली धूळ

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी घरीच करा हे 5 सोपे उपाय

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; एमआयएम उमेदवाराच्या रॅलीवर पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

Maharashtra Elections Result Live Update: कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी

SCROLL FOR NEXT