Bigg Boss Marathi 6 
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : तन्वीला विशालशी पंगा पडणार भारी; रुचितानं केली बोलती बंद, पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6-Captaincy Task : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात कॅप्टन्सी टास्क रंगला. तन्वी आणि विशालमध्ये कडाक्याचे भांडण होते. नेमका मुद्दा काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क रंगला.

विशाल-तन्वीमध्ये कडाक्याचे भांडण होते.

रुचिता तन्वीला टास्क दरम्यान सुनावते.

'बिग बॉस मराठी ६' मध्ये प्रत्येक टास्कमध्ये भांडण होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे प्रेक्षक 'बिग बॉस मराठी ६' चा चांगलाच आनंद घेताना दिसत आहे. घरात आता बिग बॉसच्या दुसऱ्या कॅप्टनसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. कॅप्टन्सीच्या शर्यतीतून सदस्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रहांचे मॉडेल हटवायचे आहेत. याच टास्कदरम्यान तन्वीने जेव्हा विशालला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तेव्हा विशालने आणि तन्वीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.

'बिग बॉस'च्या घरात नवीन कॅप्टन्सी टास्क रंगला आहे. ज्याचे नाव 'ग्रहांचा टास्क' असे आहे. बिग बॉसने शेअर केलेल्या व्हिडीओत तन्वी आणि विशालमध्ये भांडण पाहायसा मिळाले. दोघे एकमेकांना बोलताना दिसले. यांच्या भांडनात रुचिताने उडी घातली. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "ग्रहांचा टास्क, कोणाला दाखवणार Captaincy च्या उमेदवारीची दिशा आणि कोणाची होणार दुर्दशा!" असे लिहिले आहे. तन्वी-विशालमध्ये नेमकं बोलणे काय होते? वाचा-

  • तन्वी : "मी विशाल या ग्रहाला काढतेय, तो टोळीच्या मेंबरलाच फक्त सपोर्ट करू शकतो..."

  • विशाल : "ही टोळी आहे तर आहे! तुमच्यासारखे पाठीमागून खेळत नाही!"

  • तन्वी : " म्हणून मला नॉमिनेट करायला बघता..."

  • रुचिता : "टोळी नाही आता, फक्त पोळी आहे नशिबात... बस भाजत..."

'बिग बॉस मराठी'च्या घराला जणू रणांगणाचे स्वरूप आले आहे. कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी सदस्यांमध्ये रंगलेल्या 'ग्रहांच्या टास्क'ने घरातील वातावरण पूर्णपणे तापले आहे. मैत्री आणि गटांमधील राजकारण आता उघडपणे समोर येऊ लागले आहे. विशाल आणि तन्वी मधील शाब्दिक चकमक घरात कोणते नवीन वादळ घेऊन येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

Silver Earrings Design: सिल्वर कानातल्यांचा भलताच ट्रेंड, हे आहेत 5 लेटेस्ट कानातले डिझाईन्स

Accident News : मॉर्निंग वॉकला गेली, पुन्हा घरी परतलीच नाही; कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, देशसेवेचं स्वप्न अपूर्णच राहिलं

Sunil Shetty On Marathi Language: मला बोलायला भाग पाडू नका...; हिंदी-मराठी भाषा वादावर सुनील शेट्टीचं सडेतोड विधान

Iron Kadhai Benefits : लोखंडी कढईत जेवण बनवण्याचे 'हे' आहेत ५ फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT