Suraj Chavan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : सूरजचा स्वॅगच लय भारी; IPLच्या सामन्यात वाजलं 'झापुक झुपूक' गाणं, पाहा VIDEO

Zapuk Zupuk Song : सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशात चित्रपटाचे 'झापुक झुपूक' गाणे IPLच्या मॅचमध्ये वाजवण्यात आले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचा 'झापुक झुपूक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस मराठी 5'मुळे सूरजला खूप लोकप्रियता मिळाली आहे. सध्या 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk ) चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. प्रमोशन निमित्तच 'गुलीगत किंग' काल आयपीएलची मॅच पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहचला.

काल (7 एप्रिल) ला 'मुंबई इंडियन्स' विरुद्ध 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु' अशी मॅच वानखेडे स्टेडियमवर रंगली. या मॅचमध्ये 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु'ने बाजी मारली. या मॅच दरम्यान सूरजच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाचे 'झापुक झुपूक' हे गाणे वाजले. याचा खास व्हिडीओ देखील सूरजने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किंग विराट कोहली आणि सूरज चव्हाण समोरासमोर पाहायला मिळत आहे.

सूरजने या खास व्हिडीओला हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, " किंग कोहली आणि तुमचा टॉपचा किंग समोरा समोर…! पहिल्यांदाच येवढ्या मोठ्या वानखेडे स्टेडियमवर मॅच बघायला गेलो आणि आपल्या भारत देशाचा विराट भाऊ जवळून दिसला…! बाकी स्टेडियम मध्ये झापुक झुपूक खऊन वाजलय वीडियो उद्या सोडतो…२५ एप्रिल - झापुक झुपूक तुमच्या जवळच्या थेटरात…!"

सूरज चव्हाणच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सूरज मॅच पाहण्यासाठी हटके लूकमध्ये गेला होता. त्याने 'मुंबई इंडियन्स'ची जर्सी परिधान केली होती. तर स्टेडियमवर तो काळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसला. त्याच्या शर्टवर 'टॉपचा किंग' असे लिहिले होते. सूरजच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं आहे. हा चित्रपट 25 एप्रिलला रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मानलं राव! शेतकऱ्यांच्या लेकींच्या मदतीसाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे सरसावले; शिक्षणासाठी 11 लाखांची मदत

लग्नानंतर स्तनांचा आकार खरोखर वाढतो? नेमकं कारण काय? तज्ज्ञांनी दिली खरी माहिती

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची बैठक

Medha Kulkarni Hospitalised : लवकरच भेटू, भाजप खासदार मेधा कुलकर्णी रुग्णालयात दाखल, पुणेकरांसाठी लिहिला खास संदेश

Sleep Medication: झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर तुमच्या मेंदूसोबत नेमकं काय घडतं? वाचून तुमची झोपच उडेल!

SCROLL FOR NEXT