
Suraj Chavan: जिओ स्टुडिओज् आणि केदार शिंदे यांच्या "झापुक झुपूक" या सिनेमाचा टिझर नुकताच रिलीझ झाला आहे. बिग बॉस मराठी सिझन ५ चा विनर सूरज चव्हाण या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेश्रुष्टीत पदार्पण करतोय. टिझर ला प्रेक्षकांकढुन भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता "झापुक झुपूक" या सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालंय. ज्याला यावर्षीचे पार्टी साँग म्हणता येईल.
या गाण्याचे संगीतकार मराठी रॅप आणि हिप-हॉप संगीत बनवणारा, मराठमोळा कृणाल घोरपडे उर्फ क्रेटेक्स हे आहेत. तांबडी चामडीच्या यशानंतर, क्रेटेक्स आणखी एक ग्रूव्ही ट्रॅक घेऊन आला आहे. जो पुन्हा एकदा गाण्याच्या तालावर थिरकायला भाग पाडणार आहे. 'पट्या द डॉक (Patya the Doc) यांनी हे गाणं गायलं आहे. तर गीतकार प्रतीक संजय बोरकर आहेत.
कृणाल म्हणजे डीजे क्रेटेक्स आपला आनंद व्यक्त करत म्हणाला की, तांबडी चांबडी गाण्या प्रमाणे, मला खात्री आहे की प्रेक्षकांना माझं हे झापूक झुपूक गाणं सुद्धा नक्की आवडेल. माझं काम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल मी जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे यांचा खूप आभारी आहे. झापूक झुपूक चित्रपटाच्या या शीर्षक गाण्यात मराठी तडका तर आहेच पण एक जल्लोष आणि उत्साह आहे जो तरुणांना आणि श्रोत्यांना गाण्याच्या तालावर थिरकायला नक्कीच भाग पाडेल.
आकर्षक हुक स्टेप, उत्साही संगीत, कमालीची ऊर्जा आणि उत्तम चित्रीकरणामुळे हे गाणं आणखी रंजक ठरलय जे नेहमीच चाहत्यांना लक्षात राहील. ह्या अगोदर सुद्धा निर्माते केदार शिंदे ह्यांना आपल्या चित्रपटातील सुपरहिट गाण्यांसाठी प्रेक्षकांकडून नेहमीच दाद मिळाली आहे आणि आता झापुक झुपूक मधून ते पुन्हा एकदा चाहत्यांसाठी अनोख्या संगीताची खास भेट घेऊन येत आहेत.
"झापुक झुपूक" या चित्रपटात मनोरंजना सोबतच भरपूर काही अनुभवयाला मिळणार आहे. सिनेमा मध्ये सूरज सोबत मराठी कलाकार जसे जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' हा सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.