Suraj Chavan Wedding SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Wedding : 'गुलीगत किंग' चढला बोहल्यावर; सूरज चव्हाणचा शाही विवाह सोहळा थाटात पार, पाहा VIDEO

Suraj Chavan Wedding Video : 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. शाही लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

सूरज चव्हाण लग्न बंधनात अडकला आहे.

सूरज चव्हाणने मामाची मुलगी संजनासोबत लग्नगाठ बांधली आहे.

सूरज चव्हाणच्या लग्नाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

रील स्टार ते 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता हा खडतर प्रवास पार करणारा अभिनेता सूरज चव्हाण (Suraj Chavan Wedding) अखेर लग्न बंधनात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून गुलीगत किंग आपल्या लग्नामुळे चांगला चर्चेत होता. सूरज चव्हाणने मामाची मुलगी संजनासोबत लग्नगाठ बांधली आहे. काल (29 नोव्हेंबर)ला त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. सूरजच्या लग्नाला मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. सूरजला पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक होते.

सूरज रॉयल कारमधून एन्ट्री घेतली. वाजत गाजत लग्नाची वरात आली. सूरज आणि जान्हवी किल्लेकरने वरातीत बेभान होऊन डान्स केला. सूरज 'झापुक झुपूक' गाण्यावर थिरकला. त्यानंतर सूरज चव्हाण बोहल्यावर चढला. सूरजच्या नवीन आलिशान घरात मेहंदीचा कार्यक्रम रंगला. त्यानंतर सूरज आणि संजना हळदीत माखले. एकमेकांच्या हातात अंगठी घालून त्यांची साखरपुडा देखील थाटात पार पडला.

लग्नाचा लूक

सूरज आणि संजनाने लग्नासाठी पारंपरिक लूक केला होता. सूरजने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी, डोक्यावर फेटा, गळ्यात मोत्याची माळ असा लूक केला होता. तर संजनाने सुंदर निळ्या रंगाची साडी नेसली होती. सोनेरी रंगाचा शेला, नाकात नथ, हातात हिरवा चुडा, ब्राइडल मेकअपमध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत होते. सूरज चव्हाणचे लग्न माऊली गार्डन हॉलवर झाले. हे ठिकाण सासवड-जेजुरी रोड, पुरंदर तालुक्यात , पुणे जिल्ह्यात आहे.

सध्या सूरज चव्हाण आणि संजनाला चाहते आणि कलाकार मंडळी शुभेच्छा देताना दिसत आहेत. चाहते खूपच आनंदी आहेत. 'बिग बॉस मराठी 5'मुळे सूरज चव्हाणला खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याचा 'झापुक झुपूक' हा चित्रपट देखील आला. सूरज चव्हाण आता गोफणे परिवाराचा जावई झाला आहे. संजना आणि सूरज यांचं लव्हमॅरेज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT