Suraj Chavan - Ankita Walawalkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan - Ankita Walawalkar : लाडक्या भावाच्या लग्नाला बहीण गैरहजर; अंकिताने सूरजसाठी केली खास पोस्ट, दिला सुखी संसाराचा मंत्र

Ankita Walawalkar Wedding Wishes For Suraj Chavan : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावालकरने सोशल मीडियावर पोस्ट करून लाडक्या भावाला सूरज चव्हाणला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण लग्न बंधनात अडकला आहे.

सूरज चव्हाणच्या लग्नाला अंकिता वालावालकर गैरहजर होती.

अंकिताने सूरजला लग्नाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण लग्न बंधनात अडकला आहे. 29 नोव्हेंबरला सूरजचा शाही विवाह सोहळा पार पडला. सूरज चव्हाणने मामाची मुलगी संजनासोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सूरज चव्हाणच्या लग्नासाठी मोठ्या मोठ्या कलाकारांना आमंत्रण देण्यात आले होते. सूरजच्या संपूर्ण लग्नात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आघाडीवर होती.

जान्हवी किल्लेकर सूरज चव्हाणला आपला भाऊ मानते. त्यामुळे भावाच्या लग्नाची पूर्ण जबाबदारी जान्हवीने दणक्यात पार पाडली. जान्हवी प्रत्येक समारंभात सूरजसोबत दिसली. मात्र सर्वत्र सूरज चव्हाणची दुसरी मानलेली बहीण अंकिता वालावालकर लग्नात उपस्थित नसल्यामुळे अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र आता अंकिताने सोशल मीडियावर पोस्ट करून सूरज- संजनाला लग्नाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. सूरज चव्हाण, अंकिता वालावालकर आणि जान्हवी किल्लेकर हे सर्व बिग बॉस मराठीमुळे एकत्र आले.

अंकिताची पोस्ट

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावालकरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात तिने सूरज-संजनाचा लग्नाचा फोटो लावून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिलं की, "प्रिय सूरज आणि संजना...आज तुम्ही एकत्र हातात हात घालून नव्या वाटेवर पाऊल ठेवत आहात. या वाटेवर कधी उजेड असेल, कधी अंधार, कधी सावल्या; पण एकमेकांचा आधार, माया आणि एकमेकांची सोबत असेल तर प्रत्येक अडचण सहज पार करता येते. जीवनात कितीही बदल झाले तरी एकमेकांसाठीचा आदर, आपुलकी आणि जिव्हाळा कायम ठेवा. छोट्या-छोट्या क्षणांत आनंद शोधा, एकमेकांच्या हसण्यात जग जिंका आणि एकमेकांच्या डोळ्यांतील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. नांदा सौख्यभरे! तुमच्या नवविवाहित जीवनाला मन:पूर्वक, हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा! - अंकिता आणि कुणाल!”

Suraj Chavan - Ankita Walawalkar

अंकिता सूरजच्या लग्नाला का आली नाही?

अंकिताने थाटात सूरज आणि संजनाचे केळवण केले होते. तसेच लग्नाच्या शॉपिंगमध्ये देखील अंकिता सूरजसोबत पाहायला मिळाली. याच दरम्यान अंकिताने सांगितले होते की, तिला सूरज चव्हाणचे लग्नाला उपस्थित राहण्यास जमणार नाही. सूरजच्या लग्नाला अंकिता उपस्थित नव्हती कारण, ती नागपूरमधील एका लग्न सोहळ्याला गेली होती. हे लग्न तिच्या जवळच्या मैत्रिणीचे होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT