Suraj Chavan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : सूरज चव्हाणचं गुलीगत लग्न ठरलं? 'तिच्या'सोबतचा खास फोटो केला शेअर, म्हणाला "स्वप्न नाही..."

Suraj Chavan Post : गुलीगत सूरज चव्हाणने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तो एका मुलीसोबत दिसत आहे. फोटोमध्ये दिसणारी मुलगी कोण जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5'मुळे सूरज चव्हाण प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला.

सूरज चव्हाणने सोशल मिडियावर मुलीसोबत फोटो शेअर केला आहे.

सूरज चव्हाणच्या लग्नाची चर्चा सोशल मिडियावर तुफान रंगली आहे.

'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने केलेल्या सोशल मिडिया पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या सर्वत्र सूरज चव्हाणच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. अलिकडेच सूरजचा 'झापुक झुपूक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने प्रेक्षकांना खूप हसवले. चित्रपटातील गाणी तुफान गाजली. 'बिग बॉस मराठी 5' मुळे सूरज चव्हाण प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला.

नुकतीच सूरजने (Suraj Chavan ) एक पोस्ट केली आहे. ज्यात त्याचा एका मुलीसोबत फोटो पाहायला मिळत आहे. सूरजची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सूरज चव्हाण साऊथ इंडियन लूकमध्ये पाहायला मिळत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि लुंगी परिधान केली आहे. एका मुलीच्या खांद्यावर हात ठेवून भन्नाट स्माइल करत सूरज पोज देताना दिसत आहे.

सूरजने शेअर केलेल्या फोटोमधल्या मुलीने देखील साऊथ इंडियन स्टाइल साडी नेसली आहे. गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या साडीत मुलगी खूपच सुंदर दिसत आहे. हातात हिरवा चुडा पाहायला मिळत आहे. तर केसात गजरा माळला आहे. तिने चेहऱ्यावर हात ठेवला आहे. फोटोमध्ये मुलीचा चेहरा रिव्हिल केला नाही. कॅप्शनमध्ये सूरजने फक्त लाल हार्ट इमोजी टाकला आहे. त्यामुळे सूरज एका डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सूरज चव्हाणच्या या पोस्टमुळे त्याचे लग्न ठरलंय? की त्याला नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच फोटोंमधील मुलीची ओळखली समोर आली आहे.

पोस्टवरील कमेंट्स

सूरज चव्हाणच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. "आज तुम्ही सगळे काँग्रॅज्युलेशन करू शकता हे काय स्वप्न नाही बरं का...", "चला सूरज भाऊसाठी एक लाईक तर बनतो वहिनीसाठी पण", "कोण आहे ओ सूरज भाऊ सांगा", "भाऊ एकदम जोरात", "एक नंबर भावा, कडक, तुम्हाला आशीर्वाद. लव यू."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रासह ८ राज्यातील उच्च न्यायालयांना नवे मुख्य न्यायाधीश; पाहा कोणाची कुठे नियुक्ती

Best Teas For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 5 चहा ठरतील फायदेशीर; जाणून घ्या कोणते आहेत?

Ukadiche Modak Recipe : उकडीचे मोदक फाटतात? 'ही' ट्रिक वापरा, प्रत्येक मोदक बनेल परफेक्ट

Maharashtra News Live Update: कृष्णराज महाडिक नेमके काँग्रेसचे की भाजपचे?

कॅबिनेट मंत्र्यांचं निधन, मध्यरात्री आला हार्ट अटॅक, राजकीय वर्तुळात शोकाकूल वातावरण

SCROLL FOR NEXT