Shreya Maskar
साऊथ इंडियन स्टाइल बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटे, हळद, मीठ, पाणी, तेल, कांदे, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो आणि लाल तिखट इत्यादी साहित्य लागते.
बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाट्याची साल सोलून त्यात हळद, मीठ आणि पाणी घालून उकडवून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून जिरं, मोहरी, हिंग, मेथी दाणे, चणा डाळ आणि कढीपत्ता घाला.
त्यानंतर फोडणीत चिंच, हिरवी मिरची घालून सर्व मिश्रण मिक्सरला वाटून घ्या.
मिक्सरला कांदा, लसूण आणि टोमॅटो घालून पेस्ट तयार करा.
पॅनमध्ये तेल गरम करून लाल तिखट, धणे पूड, हळद, कांदा - टोमॅटो पेस्ट घालून सर्व साहित्य एकजीव करा.
यात उकडलेले बटाटे घालून मिक्स करा.
शवटी भाजीवर थोडे पाणी आणि कोथिंबीर घाला.