Shreya Maskar
गणपतीला प्रसादासाठी झटपट तळणीच्या मोदक बनवा.
तळणीचे मोदक बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, मैदा, रवा, तेल, मीठ, पाणी, तूप, खसखस, ओलं खोबरं, गूळ, ड्रायफ्रूट्स, तेल आणि वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.
तळणीचे मोदक बनवण्यासाठी ताटात गव्हाचे पीठ, मैदा, रवा, गरम तेल, मीठ आणि पाणी टाकून कणिक मळा.
पॅनमध्ये तूप, खसखस, ओलं खोबरं, गूळ, ड्रायफ्रूट्सचे काप घालून मोदकातील गोड सारण तयार करून घ्या.
कणकेचे छोटे गोळे करून त्याची पारी बनवा आणि त्यात मोदकाचे सारण भरा.
हाताच्या तीन बोटांच्या मदतीने कणिकला मोदकाचा आकार द्या.
तेलात गोल्डन फ्राय होईपर्यंत मोदक तळून घ्या.
तळणीचे मोदक बनवताना पीठ जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.