Shreya Maskar
गौरी-गणपतीला नैवेद्यासाठी खास मिक्स भाजी बनवा.
मिक्स भाजी बनवण्यासाठी शेपू, चवळी, मेथी, भोपळ्याची पाने, भिजवलेले तांदुळ, तुरीची डाळ, शेंगदाण्याचा कूट, तेल, कांदा, हिरवी मिरची, मीठ इत्यादी साहित्य लागते.
मिक्स भाजी बनवण्यासाठी पालेभाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिरवी मिरची, कांदा टाकून परतून घ्या.
मिश्रणात शेंगदाण्याचा कूट, भिजवलेले तांदुळ आणि तुरीची डाळ टाकून परतून घ्या.
आता मिश्रणात चिरलेल्या भाज्या घालून मिक्स करा.
शेवटी भाजीत मीठ घालून वाफेवर शिजवून घ्या.
गरमागरम भाकरीसोबत मिक्स भाजीचा आस्वाद घ्या.