Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: 'हा नडायचं म्हणून ठरवूनच आलाय'; काल वाईल्ड कार्डनं घरात आला, आज निक्कीला भिडला!, VIDEO

Bigg Boss Marathi Season 5: पहिल्याच दिवशी संग्रामनं बिग बॉसच्या घरात राडा घातलेला दिसतो आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठीच्या घरात सातव्या आठवड्यात सुरूवातीपासूनच राडा झालेला दिसत आहे. नुकतीच बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. रांगडा गडी संग्राम चौगुलेने छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देत बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. संग्रामच्या एन्ट्रीनेच बिग बॉसच्या घरातील वातावरण बदलताना दिसत आहे.

नुकतंच बिग बॉसच्या आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये बिग बॉसच्या घरात येताच संग्राम अरबाजला धमकावताना दिसत आहे. तर आता संग्राम थेट निक्कीशी पंगा घेताना दिसतो आहे.

या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात सातव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्क होत आहे. यामध्ये बिग बॉस घरातील सदस्याना स्विमिंगपूलच्या जादुई विहरीत पाडायला सांगत आहेत. दरम्यान घरातील एक- एक स्पर्धक विहरीत उडी घेताना दिसत आहेत. संग्राम निक्कीला तुम्हाला पाण्यात जायचं आहे असं सांगतो.

यावर निक्की बिग बॉसला म्हणते, "मेडिकल कंडिशनमुळे मी पाण्यात उतरू शकत नाही." यावर संग्राम बिग बॉस, मी यांना पाण्यात ढकलणार असं म्हणतोय. यावर निक्की तुम्ही मला सांगूच शकत नाही असं म्हणते. तेवढ्यात संग्राम निक्कीला पाण्यात ढकलतो. पाण्यातून बाहेर आल्यानंतर निक्की संतापलेली दिसत आहे. निक्की पुढे , "माझ्याआधी हा घरातून बाहेर निघाला नाही ना तर माझं नाव बदला" असा चॅलेंज देताना दिसते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT