Dhananjay Powar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dhananjay Powar : कोल्हापूरचा रांगडा गडी डीपी दादाला लागली हिंदी सिनेमाची लॉटरी; साकारणार हटके भूमिका, चित्रपटाचे नाव काय?

Dhananjay Powar New Movie : 'बिग बॉस मराठी 5' फेम डीपी दादा म्हणजे धनंजय पोवार आणि वैभव चव्हाण लवकरच एका हिंदी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या चित्रपटाचे नाव जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' मधून (Bigg Boss Marathi 5) प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला सर्वांचा लाडका डीपी दादा आता लवकरच एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसमुळे धनंजय पोवार (Dhananjay Powar) याला खूप लोकप्रियता मिळाली आहे. आपल्या विनोदी शैलीने डीपीने अवघ्या महाराष्ट्राला हसवले आहे. डीपी दादा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतो. त्याचे इन्स्टाग्राम 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

आता डीपी दादाने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. डीपी दादा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. डीपी दादा लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची खास माहिती त्यांनी आपल्या युट्यूब व्हिडीओ मधून चाहत्यांना दिली आहे. तसेच या संदर्भात एक स्टोरी देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. धनंजयने स्टोरीला एक हटके कॅप्शन दिले आहे.

धनंजय पोवार यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, "एक नवीन भूमिकेमध्ये मी तुम्हाला दिसणार आहे. काही दिवसात एक मूव्ही येतोय... जो अमेझॉनवर आहे... यामध्ये वेगवेगळे कलाकार आहेत. तसेच मकरंद देशपांडे सर आणि माझा जिवलग वैभव सुद्धा आहे. या सगळ्या दरम्यान छोटे मोठे किस्से शूट, दंगा-मस्ती तुम्ही पण अनुभवा" त्याच्या युट्यूब व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Dhananjay powar

धनंजय पोवारचा चित्रपटातील लूक देखील समोर आला आहे. चित्रपटात डीपी दादा साधू बाबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. असा लूक त्याचा व्हिडीओमध्ये दिसत आहे. 'कलकर्मा' असे धनंजयच्या नवीन चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट ॲमेझॉनवर पाहता येणार आहे. डीपी दादाला मोठा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते देखील आतुर आहेत. युट्यूब व्हिडीओमध्ये धनंजयने चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानची मजा-मस्ती दाखवली आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalwar Upay: पैसा अन् सुख समृद्धीसाठी मंगळवारी करा हे उपाय, होईल फायदा

Mumbai School News : हातावर मेहंदी काढली म्हणून १५ ते २० मुलींना काढले वर्गाबाहेर, मुंबईतील शाळेचा धक्कदायक प्रकार!

रूग्णालयात हॅकर्सची नजर; महिलांचे खासगी व्हिडिओ लीक, हजारो क्लिप पॉxxx साईटवर अपलोड

द्राक्ष पंढरीत खळबळ! शेतकरी बागेत फिरायला गेला आणि... काही क्षणांत घेतलं विष|VIDEO

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

SCROLL FOR NEXT