Bigg Boss SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss फेम 'डीपी' दादानं खरेदी केली आलिशान कार, लेकानं वडिलांचं स्वप्न सत्यात उतरवलं

Dhananjay Powar New Car : बिग बॉस फेम धनंजय पोवार म्हणजे 'डीपी' दादाने आलिशान गाडी खरेदी केली आहे. ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

बिग बॉस (Bigg Boss Marathi 5 ) फेम धनंजय पोवार (Dhananjay Powar) म्हणजे महाराष्ट्राचा लाडका 'डीपी' दादाने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने घर केलं आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये धनंजय पोवार यांचा सहभाग होता. 'बिग बॉस मराठी 5' च्या टॉप-४मध्ये 'डीपी' दादा आले.

धनंजय पोवार म्हणजे 'डीपी' दादा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. मनोरंजक रील आणि आपल्या आयुष्यातील घडामोडी ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. बिग बॉसमुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. नुकतीच 'डीपी' दादाने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 'डीपी' दादाने आपल्या नव्याकोऱ्या आलिशान कारची पहिली झलक दाखवली आहे. त्यांच्या घरात नवीन पाहुणीचे आगमन झाले आहे.

स्वत:ची गाडी घेणे हे 'डीपी' दादाच्या वडिलांचे स्वप्न होते. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून त्यांनी गाडी घेण्याचे कारण सांगितले आहे. व्हिडीओ शेअर करताना 'डीपी' दादा म्हणाले की, " दीड वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी स्वप्न पाहिलं होती की त्यांच्या नातवडांनी सनरूफमधून बाहेर यावं ते स्वप्न आज पूर्ण झालं आहे. आयुष्यात असं काहीतरी कराव की लोकांनी आपलं साम्राज्य बघावं माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य बघा. गाडी घेण्यामागचे हेच मोठे कारण आहे. माझ्याकडे गाडी होती मात्र ती विकली आणि नवीन सनरूफ असलेली गाडी खरेदी केली आहे. आयुष्याचा आनंद पैशात नाही तर घरातल्या सदस्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात आहे."

'डीपी' दादाच्या या खास पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. तसेच चाहते आणि कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. धनंजय पोवार हे इचलकरंजीला राहणारे आहेत. बिग बॉसमुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakal Exit Poll: बाळापूरमधून नितीन देखमुख होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Sakal Exit Poll: अक्कलकुवा मतदारसंघातून हिना गावित होणार आमदार?

Bachchu Kadu : वेळ आल्यास मोठे पक्ष बाजूला हटवून लहान पक्ष सत्तेत; बच्चू कडू यांनी व्यक्त केला विश्वास

Healthy Fruits: 'या' फळांचे सेवन केल्यास फुफ्फुस होतील निरोगी

Chalisgaon News : शेतात बिबट्या दिसताच जीव वाचविण्याचा प्रयत्न; विहिरीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT