बॅालिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. आर्यन खान सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करेल अशी चर्चा होती. मात्र, आर्यन खान हा अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे. आर्यन वेब सीरीजच्या माध्यामातून सिनेसृष्टीत एन्ट्री करणार आहे. नेटफ्लिक्सने आर्यन खानच्या वेब सीरीजची घोषणा केली. या वेब सीरिजचे नाव 'स्टारडम' असणार आहे.
नेटफ्लिक्स आणि आणि शाहरुख खानचा प्रोडक्शन हाऊस रेड चीलीज् एंटरटेनमेन्टने या वेब सीरीजची निर्मिती केली आहे. या वेब सीरीजची घोषणा होताच अनेक कलाकारांनी आर्यनचे अभिनंदन केले आहे. त्यातच खासदार आणि अभिनेत्री कंगणा रनौत यांनी शाहरुख खानच्या मुलाचे कौतुक केलं आहे. कंगणाने सोशल मीडियावर आपला आनंद जाहिर केला आणि त्यानी घेतलेल्या पुढाकाराचे समर्थन केले आहे
आर्यन खानच्या समर्थनात कंगणा रनौतने यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली, तिने लिहिले कि, 'ही खूप चांगली गोष्ट आहे. सिनेसृष्टीतील कुटंबातील मुले काहीतरी वेगळे करत आहेत. ते केवळ मेकअप लावणे आणि वजन कमी करुन स्वतः ला कलाकार समजत नाही.आपल्या सर्वांना मिळून भारतीय सिनेमाला उंचावर घेऊन जायच आहे. ही काळाची गरज आहे. कारण ज्यांच्याकडे संसाधने आहेत ,ते सोप्या रस्त्यांची निवड करतात. आपल्याला कॅमेराच्या मागे काम करणाऱ्या लोकांची पण गरज आहे. आर्यनसाठी ही चांगली गोष्ट आहे. तो काही तरी नवीन करत आहे. त्याला लेखक आणि दिग्दर्शकच्या रुपात पाहण्यासाठी मी इच्छुक आहे'.
मंडीची खासदार आणि बॅालिवूड क्वीन कंगणा रनौत यांनी बॅालिवूडमधल्या घराणेशाहीचा मुद्दा सर्वप्रथम उचलला. त्यांनी बॅालिवूडमधल्या अनेक मोठमोठ्या दिग्दर्शकांना, निर्मात्यांना आणि अभिनेत्यांना उघड विरोध केले. जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्या त्या वेळी बड्या निर्मात्यांच्या, अभिनेत्यांच्या मुलांना विरोध केला. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या वेब सीरीजची घोषणा होताच , आलिया भट्ट, अनन्या पांडे, सुहाना खान आणि करण जौहर सारख्या अनेक कलाकारांनी त्याच अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या. मात्र, अभिनेत्री कंगणा रनौत यांनी आर्य़न खानच अभिनंदन करत त्याच्या नव्या पुढाकाराचे कौतुक केल आहे. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. पहिल्यांदाच एका स्टार किड्सची कंगणान यांनी कौतुक केलं आहे.
आर्यन खानची डेब्यू वेब सीरीज स्टारडमची अधिकृत घोषणा नेटफ्लिक्सने १९ नोव्हेंबरला केली आहे. रेड चिलीज एंटरटेनमेन्टच्या बॅनरमध्ये बनलेली ही वेब सीरीज, नेटफ्लिक्स आणि शाहरुख खानची पत्नी गौरी खानने प्रोड्यूस केला आहे. या वेब सीरीजचे लेखन आणि दिग्दर्शन आर्यन खानने केले आहे. ही वेब सीरीज २०२५ मध्ये रिलीज होणार आहे.
Edited by: Priyanka Mundinkeri