Nikki-Arbaz SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nikki-Arbaz : बिग बॉस कपल निक्की-अरबाझचं ब्रेकअप? 'त्या' पोस्टनं सोशल मीडियावर खळबळ, एकमेकांना केले अनफॉलो

Nikki Tamboli- Arbaz Patel : 'बिग बॉस मराठी ५' फेम कपल निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या नात्यात दुरावा आला असून त्यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलच्या ब्रेकअपची चर्चा

दोघांनी एकमेकांना केले अनफॉलो

'बिग बॉस मराठी ५' मध्ये दोघांच्या प्रेमाच्या नात्याची सुरुवात

'बिग बॉस मराठी ५' मधील सुपरहिट जोडी निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल कायम आपल्या नात्यामुळे चर्चेत राहिली आहेत. अलिकडेच निक्कीचा वाढदिवस झाला. अरबाजने निक्कीसाठी स्पेशल सोशल मिडिया पोस्ट केली. ज्यात त्यांचे रोमँटिक फोटो आणि खास मेसेज पाहायला मिळाला. एवढ्या आनंदानंतर आता मात्र निक्की-अरबाजच्या आयुष्यात वादळ आले आहे. 'बिग बॉस मराठी ५'नंतर निक्की-अरबाज एकमेकांना डेट करत आहेत. मात्र नुकतीच दोघांनीही इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

अरबाजची पोस्ट

"आपल्या जोडीदाराची फसवणूक करणे, त्यानंतर घरी परतल्यावर त्यांच्या डोळ्यात पाहून 'मी तुझ्यावर प्रेम करतो/करते' असे सांगणे, हा अनादराचा एक वेगळाच आणि अत्यंत खालच्या पातळीचा प्रकार आहे. जे बोलायचे होते ते मी बोललो आहे."

Nikki Tamboli- Arbaz Patel

निक्कीची पोस्ट

"जे सत्य सांगितले जात नाही ते असे- अफेअर्स केवळ एखादी नवीन व्यक्ती अत्यंत आकर्षक वाटते म्हणून होत नाहीत; तर जुन्या जोडीदाराने दिलेली वचने पाळणे किंवा त्यांचा आदर करणे थांबवल्यामुळे ते घडतात."

निक्की-अरबाजने फसवणुकीशी (चीटिंग) संबंधित सूचक पोस्ट्स शेअर केल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनी एकमेकांना अनफॉलोही केले आहे. अद्याप अधिकृतरित्या निक्की-अरबाजने आपल्या ब्रेकअपच्या चर्चांना दुजोरा दिलेला नाही किंवा त्याचे खंडनही केलेले नाही. त्यांच्या विभक्त होण्याबाबत निक्की किंवा अरबाज यांच्याकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.निक्की-अरबाजच्या पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT