नेपाळमध्ये भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळित
प्रसिद्ध अभिनेत्याचा थोडक्यात वाचला जीव
पुरामुळे नेपाळचे प्रचंड नुकसान
नेपाळमधील दोन (रसुवा, नुवाकोट) जिल्ह्यांमध्ये बुधवारी पहाटे अचानक आलेल्या भीषण पुरामुळे हाहाकार उडाला. या भयंकर परिस्थितीचा अनुभव प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला आहे. 'माई' (Mai) आणि 'इनसाइड एज' (Inside Edge) मधील भूमिकांमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता अंकुर रतन यांचा जीव थोडक्यात वाचला. अभिनेत्याने सांगितले की, नेपाळमधील हिमालयीन जिल्हा असलेल्या 'रसुवा' भागात अचानक आलेल्या पुराचा (flash flood) तडाखा बसण्यापूर्वी अर्धा दिवस आधीच तो आणि त्याची टीम त्या भागातून पुढे गेले होते. अभिनेता अंकुर रतनही या महापुरात अडकले असते, मात्र काही तासांपूर्वी तिथून निघाल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला.
कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेलेल्या अभिनेता अंकुर रतनने सांगितले की, "ज्या ठिकाणी तो थांबला होता, ती सर्व ठिकाणे या नैसर्गिक आपत्तीत वाहून गेली आहेत हे समजल्यावर त्याला धक्का बसला आहे... " तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी 'भोटे कोशी' नदीला अचानक प्रचंड पूर आला. या पुरामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला असून वस्त्या, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
रतनने सांगितल्याप्रमाणे, २२ ऑगस्ट रोजी काठमांडूला पोहोचला होता आणि पूर येण्याच्या अवघ्या १२ तास आधीच त्या भागातून पुढे गेला होता. अभिनेता म्हणाला, "त्या वेळी आम्हाला धोक्याची कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती. वातावरण पूर्णपणे वेगळे होते; लोक आनंदी होते आणि यात्रेसाठी पुढे जाण्यास उत्सुक होते. आम्ही वेळोवेळी हवामानाची माहिती (weather apps) तपासायचो. परंतु त्यात कोणत्याही संभाव्य धोक्याचे, अचानक येणाऱ्या पुराचे किंवा अत्यंत खराब हवामानाचे संकेत नव्हते." असे त्याने पीटीआयला (PTI) सांगितले.
रतनने पुढे सांगितले की, "जिवंत राहिल्याबद्दल मला कृतज्ञता वाटते, पण त्याच वेळी मनात खोल दुःखही आहे. ज्या लोकांना मी भेटलो आणि ज्या ठिकाणी मी राहिलो, त्या आठवणी माझ्या मनात आहेत. ते सर्व काही नष्ट झाले आहे, यावर विश्वासच बसत नाही. या अनुभवामुळे जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आपल्याला अनेकदा वाटते की परिस्थितीवर आपले नियंत्रण आहे, परंतु निसर्गाच्या प्रचंड शक्तीसमोर आपण किती लहान आणि असहाय्य आहोत, याची जाणीव आपल्याला होते. "
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.