Bigg Boss Couple SAAM TV
मनोरंजन बातम्या

'बिग बॉस' कपल Nikki अन् Arbaz ची पहिली ट्रिप, कुठं गेले फिरायला? पाहा PHOTOS

Nikki And Arbaz Trip : 'बिग बॉस मराठी 5' कपल निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या पहिल्या ट्रिपचे फोटो पाहा.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5 ) गाजवणारे कपल म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. घरात यांच्यात वाद, मैत्री आणि प्रेम या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. यांचे नाते आता शो पुरता मर्यादित न राहता घराच्या बाहेरही ते आपले नातं जपत आहेत.

arbaj patel

बिग बॉसनंतर निक्की (Nikki Tamboli ) आणि अरबाज दोघ ट्रिपला गेले आहेत. मंगळवारी त्यांना एअरपोर्टवर स्पॉट केले गेलं. त्यानंतर निक्कीने इन्स्टाग्राम चंदीगढ लोकेशनची स्टोरी टाकली आणि त्यानंतर अरबाजने मनाली हिमाचल प्रदेश लोकेशन असलेली स्टोरी टाकली. त्यामुळे निक्की आणि अरबाज मनालीला गेल्याचे नक्की झाले आहे. तसेच निक्कीने इन्स्टाग्राम स्टोरीला तिचा आणि अरबाजचा रॉमेंटिक व्हिडीओ शेअर केला आहे. निक्की आणि अरबाज एकत्र ट्रिपला गेल्यामुळे त्यांच्यात नेमकं नातं काय हे जाणून घेण्यास निक्की-अरबाजचे चाहते उत्सुक आहेत.

बिग बॉसमध्ये निक्की आणि अरबाजचा मस्त बॉन्डिंग पाहायला मिळाले. अरबाजच्या पूर्व आयुष्यामुळे निक्की आणि अरबाजमध्ये (Arbaz Patel) अनेक वेळा दुरावे आले. मात्र अखेर त्यांनी सर्व गैरसमज दूर करून पुन्हा एकत्र आले. बिग बॉसच्या घरातून जेव्हा अरबाज बाहेर गेला होता. तेव्हा निक्की खूप रडली होती. अरबाजचे अचानक घर सोडून जाणे तिला सहन झाले नव्हते.

nikki tamboli

'बिग बॉस मराठी 5'मध्ये निक्की टॉप 3 मध्ये आली होती. या सीझनचा विजेता सूरज चव्हाण झाला. बिग बॉसमुळे निक्की आणि अरबाला खूप लोकप्रियता मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gold Rate : लक्ष्मीपूजनाला सोन्याची दिवाळी, तब्बल 3 हजार 300 रुपयांनी महागलं, वाचा आजचे दर

Jalna Police : दारूची अवैध तस्करी; जालना पोलिसांची कारवाई, आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT