Ankita Walawalkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar : 'माझं डोकं फिरेल...' म्हणतं कोकण हार्टेड गर्लने Bigg Boss न पाहण्याचा घेतला निर्णय; नेमकं कारण काय?

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर अंकिताने बिग बॉसच्या घरातील प्रवासावर मोठा खुलासा केला आहे. जाणून घ्या अंकिता नेमकं काय बोली.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' ने (Bigg Boss Marathi 5) अलिकडेच निरोप घेतला आहे. सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता ठरला. तर अभिजीत सावंत आणि निक्की तंबोळी टॉप 2 स्पर्धक ठरले. या सीझनमध्ये कोकण हार्टेड गर्ल (Kokan Hearted Girl) म्हणजे अंकिता वालावलकर देखील सहभागी होती. तिने संपूर्ण 70 दिवस गेम खेळला. अंकिताने बिग बॉसच्या घरात आपल्या कमाल गेम दाखवला. अंकिताने आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट करून तिच्या बिग बॉसच्या प्रवासाविषयी सांगितले आहे. यात तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

घराच्या बाहेर आल्यावर अंकिताने (Ankita Walawalkar ) अनेक गोष्टींचा खुलासा देखील केला. तिने आपल्या जोडीदाराचा चेहरा देखील महाराष्ट्रासमोर आणला. 'पाणी' या चित्रपटाचा प्रिमिअर सोहळा पार पडला. त्याचा एक व्हिडीओ अंकिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ठिकाणी तिला महेश मांजरेकरही भेटले. अंकिताने महेश मांजरेकरांना (Mahesh Manjrekar ) विचारले की, "मी गेममध्ये काही चुकीचं वागले नाहीये ना? कारण मला हे त्यांच्याकडून जाणून घ्यायचे होते. यावर महेश सरांनी जे उत्तर दिले त्यावर मी बरोबर होते असा आत्मविश्वास मला मिळाला. " असे अंकिता बोली.

अंकिताने सांगितले की, "मी घराबाहेर आल्यानंतर बिग बॉसचा एकही एपिसोड पाहिला नाही. माझ्या घरच्यांच्या बोलण्यावरून आणि जे कुणालने सांगितले त्यावरून समजते की, काय दाखवलं आणि काय नाही ते...बऱ्याच गोष्टी टीव्हीवर दाखवण्यात आल्या नाही आहेत. त्यामुळे मी हा सीझन पूर्ण बघितला तर माझं डोकं फिरेल. स्वतःला गप्प ठेवण्यासाठी हा सीझन न पाहणेच योग्य ठरणार आहे."

अंकिता वालावलकर आता लवकरच कुणाल भगतबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. प्रेक्षक तिच्या लग्नासाठी खूप आतुर आहेत. तसेच ती नवीन कोणता प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT