Anil kapoor Rejected Pan Masala AD
Anil KapoorSAAM TV

Anil Kapoor: झक्कास! बॉलिवूड अभिनेत्याने धुडकावली 10 कोटींची पान मसाल्याची जाहिरात

Anil kapoor Rejected Pan Masala AD : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने पान मसाल्याच्या जाहिरातीला नकार दिला आहे. प्रेक्षकांप्रति जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.
Published on

बॉलिवूडचा अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) कायमच त्याच्या अभिनयामुळे लोकांच्या मनात घर करून राहिला आहे. पात्र कोणतेही असो अनिल कपूर ते गाजवतोच. अनिल कपूरचा मोठा चाहता वर्ग आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अनिल कपूर खूप आवडतो.

मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने एका पान मसालाच्या जाहिरातीला नकार दिला आहे.आपल्या प्रेक्षकांप्रती जबाबदारी भान ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्या चाहत्यांना आपल्याकडून योग्य ती माहिती जावी हाच त्यामागचा उद्देश आहे. तब्बल 10 कोटी रुपयांच्या पान मसालाच्या जाहिरातीला अनिल कपूरने नकार दिला आहे. अनिल कपूरने सांगितले की, "काही पैशांसाठी मी लोकांच्या आरोग्याशी खेळणार नाही. कितीही पैसे मिळत असले तरी प्रेक्षकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रोडक्टचा प्रचार मी करणार नाही."

बॉलिवूडच्या इतर अनेक अभिनेत्यांनी या आधीही पान मसालाची जाहिरात केली आहे. त्यावेळी त्यांना नेटकऱ्यांकडून ट्रोल देखील करण्यात आले. यात शाहरुख खान, अक्षय कुमार,जय देवगण आणि टायगर श्रॉफ या बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे.

अनिल कपूर वयाच्या ६७ व्या वर्षी एकदम फिट दिसतात. त्याचे लूक्स पाहून आजच्या तरुणांना प्रोत्साहन मिळते. अनिल कपूर नेहमी आरोग्याच्या बाबतीत हेल्दी डाएट प्रमोट करताना दिसतो. अलिकडेच अनिल कपूर दिव्या खोसलाच्या 'सावी' या चित्रपटात दिसले. त्यांची फायटरमधील भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडली. अनिल कपूरच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.

Anil kapoor Rejected Pan Masala AD
'Bigg Boss 18' च्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे, टीव्ही गाजवणाऱ्या स्टार्सची स्पेशल बॉन्डिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com