Bigg Boss Marathi 5 Contestant Facing Water Problem Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 5 : पहिल्याच दिवशी 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धकांच्या तोंडचं पळालं पाणी; सदस्य कसं आव्हानांना तोंड देणार ? पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 5 Latest Promo : पहिल्या दिवशी बिग बॉसच्या घरातल्या सर्व स्पर्धकांचं तोंडचं पाणी पळालं आहे. आता हे सर्व स्पर्धक पहिल्याच दिवशी कसं आव्हानांना तोंड देणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Chetan Bodke

'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर दिमाखात पार पडला असून रितेश भाऊने सर्व स्पर्धकांचं त्याच्या स्टाईलने स्वागत केलंय. आता घरातील 16 सदस्य त्यांच्या स्टाईलने खेळ कसा रंगवणार ? आणि रितेश भाऊ कसा कल्ला करणार ? हे प्रेक्षकांना आजपासून पाहायला मिळणार आहे. आजपासून सर्व स्पर्धकांचे मुखवट्यामागील खरे चेहरे अनुभवायला मिळणार आहेत. अशातच पहिल्या दिवशी बिग बॉसच्या घरातल्या सर्व स्पर्धकांचं तोंडचं पाणी पळालं आहे. आता हे सर्व स्पर्धक पहिल्याच दिवशी कसं आव्हानांना तोंड देणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

नुकतंच कलर्स मराठीच्या सोशल मिडिया हँडलवर एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी स्पर्धकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. पहिल्याच दिवशी घरात पाणी येत नसल्याने सदस्यांची अडचण झालेली पाहायला मिळत आहे. "पाणी सगळं गेलेलं आहे, 'बिग बॉस' पाणी, सगळ्यात आधी आंघोळ करायची असते तर त्याच्यासाठी पाणी नाही." असं म्हणत स्पर्धक 'बिग बॉस'ला पाणी सोडण्यास सांगत आहेत.

पाणी अत्यावश्यक बाब असल्याने घरातील सर्व सदस्य हतबल झाले आहेत. पाणी मिळण्यासाठी काकुळतीने 'बिग बॉस'ला ते विनंती करत आहेत. त्यावर बिग बॉस म्हणतात,"आता फक्त घरातलं पाणी गेलंय... थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळेल". त्यामुळे पहिल्याच दिवशी स्पर्धकांना मोठा धक्का बसलाय. ही तर फक्त सुरूवात आणखी पुढे स्पर्धकांना काय काय पाहायला मिळणार पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. घरात पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार, हे मात्र नक्की.

'बिग बॉस मराठी'च्या ५ व्या सीझनच्या घराचं दार अखेर उघडलं आहे. पण यंदा चक्रव्यूहामुळे सदस्यांना त्यांच्याप्रमाणे खेळता येणार आहे. सदस्यांचा खेळ पलटवून लावायला आणि त्यांना पेचात अडकवायला 'बिग बॉस' आणि रितेश देशमुख सज्ज झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांना प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजेच बेड, बाथरुम, खाण्यापिण्याच्या सामानासाठी किंमत मोजावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT