Prajakta Mali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : 'मला प्राजक्ता आवडते...' बिग बॉस स्पर्धकाने केलं 'फुलवंती'चं कौतुक

Phullwanti Premiere : बिग बॉस स्पर्धकाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी तो प्राजक्ता माळीचा मोठा चाहता आहे असे सांगितले आहे.

Shreya Maskar

प्राजक्ता माळीनं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करते. तिच्या अनेक फोटोंवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडतात. ती अभिनयासोबतच उत्तम कवयित्री देखील आहे. तसेच तिचा स्वतः ज्वेलरीचा व्यवसायही आहे. सध्या प्राजक्ता 'फुलवंती' मुळे चांगलीच चर्चेत आहे. तिचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस मराठी 5' चं (Bigg Boss Marathi ) घर अभिजीत सावंतने (Abhijeet Sawant) खूप गाजवलं आहे. तो बिग बॉसचा उपविजेता ठरला आहे. बिग बॉसच्या घरात त्याची निक्की तांबोळीसोबत चांगली मैत्री झाली.'बिग बॉस मराठी 5'ची ट्रॉफी सूरज चव्हाणने उचलली आहे. अभिजीतने इंडियन आयडलचं पर्व देखील जिंकलं आहे. बिग बॉसच्या घरात अभिजीतने आपल्या खेळाने प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत.

बिग बॉसचा उपविजेता अभिजीत सावंतने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो फुलवंतीचं भरभरून कौतुक करत आहे. तो बोलतो की, " मंगेश यांनी मला फुलवंतीच्या प्रिमिअरला (Phullwanti Premiere) बोलावले, आम्ही छान मित्र आहोत. तसेच प्राजक्ता माळीला (Prajakta Mali ) पाहायला मिळेल. मी तिचा मोठा चाहता आहे. " त्यानंतर तो कार्यक्रमाचा व्हिडीओ दाखवतो. या व्हिडीओला त्यांनी हटके कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "फुलवंती हा चित्रपट अप्रतिम आहे. चित्रपटाच्या प्रिमिअरचे काही क्षण"

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांचा 'फुलवंती' हा चित्रपट 11 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'फुलवंती' वर प्रेक्षकांनी भरपूर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT