Bigg Boss Marathi 4 Grand Finale Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: पाच स्पर्धक, एक विजेता; कोणाला मिळणार बिग बॉस मराठीच्या जेतेपदाची ट्रॉफी?

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा विजेता अवघ्या महाराष्ट्राला मिळणार आहे.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा विजेता अवघ्या महाराष्ट्राला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घरात स्पर्धकांची एकमेकांमधील स्पर्धा, काही क्षुल्लक कारणावरुन केलेले राडे, त्यातून ही तयार झालेली मैत्री हा सर्व प्रत्येक स्पर्धकाचा प्रवास प्रेक्षकांचे मनोरंजन करुन गेला. बिग बॉस चा चौथा सीझन २ ऑक्टोबरपासून सुरु झाला होता.

शो सुरु झाला होता तेव्हा, एकूण १६ स्पर्धक आणि खेळामध्ये बरेच व्हाईल्ड कार्ड स्पर्धकही आले होते, या सर्वांना हरवुन हा प्रवास आता पाच स्पर्धकांपर्यंत आला आहे.

८ जानेवारीला अर्थात आज बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा महाविजेता मिळणार आहे, त्यामुळे स्पर्धकांसह प्रेक्षकही बरेच उत्साही आहेत. या टॉप ५ स्पर्धकांची जबरदस्त लढत होती. प्रत्येक स्पर्धक जिंकण्यासाठी कोणती पातळी गाठतील याचा नेम आपल्याला या सीझनमध्ये दिसून आला. आज संध्याकाळी सात वाजता या ग्रँड फिनालेला सुरुवात आहे. आज अपुर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, राखी सावंत आणि किरण माने या पाच स्पर्धकांमध्ये चुरस रंगणार आहे.

अपुर्वा नेमळेकरने आपल्या एन्ट्रीनेच सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधले. ती आपल्या गेममुळे चर्चेत आली नाही तर घरातल्या स्पर्धकांसोबत नाते जोपासत, मैत्री ठेवत, मन जपल्याने चर्चेत आली. अमृता धोंगडेची मिसेस मुख्यमंत्री म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ओळख. तिच्या चुकीच्या खेळाने आणि गोंधळ घालत असल्याने नेहमीच चर्चेत होती.

तर तिसरा स्पर्धक आहे, अक्षय केळकर. अक्षय आपल्या मास्टर माईंड खेळीने शोच्या शेवटच्या भागात आला आहे, हे अनेकदा बोलला आहे. आपल्या एन्ट्रीनंतर हुशारीने खेळत जुळवुन घेत स्वत:मध्ये काय वेगळेपण आहे हे सिद्ध केले.

वाईल्ड कार्डच्या रुपात आलेल्या राखीने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला वेगळीच प्रसिद्धी दिली.आपल्या विनोदाने, मस्तीने सर्वांसोबत हसुन खेळून तिने मनोरंजन केले. तिने सदस्यांसोबत मस्ती केली तर कधी घरातील पुरुष मंडळीसोबत फ्लर्ट करतांना दिसली. मात्र तिच्या घरात येण्याने घरातील वातावरण बदललं हे मात्र नक्की.

आणि शेवटचा स्पर्धक म्हणजे सातारचा बच्चन अर्थात किरण माने. किरणची घरात एन्ट्री होताच राडे घालत मैत्री ही जपली. आता तोच किरण माने बिग बॉसच्या चौथ्या फिनालेमध्ये जिंकणार का पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या पाचही स्पर्धकांमध्ये संध्याकाळी चांगलीच काटे की टक्कर रंगणार आहे. कोणाला बिग बॉसच्या चौथ्या सीझनचे जेतेपद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT