Bigg Boss Latest Update Instagram/ @colorsmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: रुचिका 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर, 'आता पुढे रोहितचे काय?'; भावनिक पोस्ट चर्चेत

'बिग बॉस मराठी'च्या घरामधून रुचिरा जाधव बाहेर पडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi Latest Update: सध्या बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंदीत येतोय. चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना चांगलेच सपोर्ट करताना दिसत आहेत. जस- जसे दिवस पुढे जात आहेत त्याप्रमाणे स्पर्धकांसोबत प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचतोय. बिग बॉस स्पर्धकांना प्रत्येक आठवड्यात कठीण कठीण टास्क देत आहेत. त्यामुळे सर्वांनाच हा खेळ पाहण्यसाठी एक वेगळीच उर्जा मिळतेय.

प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी बिग बॉसच्या घरात महेश मांजरेकर चावडी भरवतात. त्या चावडीत प्रत्येक स्पर्धकाला आपल्या पुढील खेळाची दिशा ठरवायची असते. कोणाची आपल्या खेळामुळे स्तुती होते.

काहींना खेळातील चुका सुधारण्याचे आव्हाहन करत मार्ग दाखवला जातो. तर काहींना खडेबोल सुनावले जातात. गेल्या ४० हुन अधिक दिवसात बिग बॉसच्या घरातून ४ स्पर्धक बाहेर गेले आहेत. तर एका स्पर्धकाची वाईल्ड कार्ड म्हणुन एन्ट्रीही झाली आहे.

नुकतीच बिग बॉसच्या घरातून आणखी एका स्पर्धकाला बाहेर जावे लागले आहे. ती स्पर्धक रुचिरा जाधव आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रुचिरा जाधव घराबाहेर गेली आहे. रुचिरा बाहेर गेल्याने तिचा बॉयफ्रेंड रोहितचं काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. प्रसाद आणि रुचिरा डेंजर झोनमध्ये होते, यातून रुचिराला घर सोडून जावे लागले आहे. रुचिराने घर सोडल्यानंतर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

त्यात रुचिरा म्हणते, "खूप काही करायचं होतं. खूप काही बोलायचं होतं. गोष्टी अर्धवट राहिल्या याची खंत आहे. मी खरी राहिले. मी खरी खेळले, याचा अभिमान आहे. तुम्हा सगळ्यांचं प्रेम पाहिजे म्हणजे पाहिजे... खूप प्रेम.. तुमचीच रुचिरा".

या आठवड्यातील बिग बॉसच्या घरातील चावडी बरीच रंगली. 'शेतकरीच नवरा हवा' या मालिकेतील कलाकार रुचा गायकवाड, प्रदिप घुले आणि निर्माती श्वेता शिंदे बिग बॉसच्या घरातील सदस्यांना भेटले. तर सदस्यांसोबत 'गद्दार कोण' हा खेळ चांगलाच रंगला. या खेळात रुचिराने अपूर्वाला तर विकासने किरणला गद्दार ठरवले.

विकासच्या कृतीमुळे किरण खूप दुखावला असून त्यांने स्वतःलाच गद्दारचा टॅग लावून घेतला. तर यशश्रीने तेजस्विनीला गद्दार ठरवले. समृद्धीने अमृता धोंगडेला तर अक्षयने रोहितला गद्दार ठरवले. प्रसादने किरणला तर अमृता धोंगडेने प्रसादला गद्दार ठरवले. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये चुगली बुथद्वारे आलेल्या चुगल्यांनी यशश्री अपूर्वा, अक्षय आणि अमृता देशमुखवर चांगलीच भडकली.

'आरोपी कोण' या टास्कमध्ये प्रसादला आरोपी ठरवण्यात आले आणि त्याला शिक्षादेखील सुनावली. ज्यामध्ये प्रसादने अमृता देशमुखसोबत डान्स करावा असे सांगण्यात आले. पुढच्या आठवड्यात कोण राहील? कोण जाईल? कोण होईल नॉमिनेट? कोण होईल सेफ? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahud Ghat Traffic : गॅस टँकर अपघातामुळे राहुड घाटात वाहतूक कोंडी कायम; मनमाड मार्गाने वळविली वाहतूक

Maharashtra Live News Update: जीआरमधील मराठा समाज या शब्दावर आक्षेप - भुजबळ

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

Actor Death Threats : जर तुझ्या आई, बहिणीला काहीही सांगितलंस...; प्रसिद्ध अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Chanakya Niti : ही ३ गुपितं कोणालाही सांगू नका; नाहीतर जवळचे मित्रसुद्धा होतील शत्रू

SCROLL FOR NEXT