mahesh manjrekar who gave the hint who is winner of bigg boss 4 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: मांजरेकरांनीच दिला बिग बॉस विनरचा क्लू, चाहत्यांमध्ये 'या' एकाच नावाची होते चर्चा...

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा कोण विजेता होणार याची बरीच चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा कोण विजेता होणार याची बरीच चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. आज बिग बॉसचा अखेरचा दिवस असणार आहे. बिग बॉसच्या घरातील एकूण एक स्पर्धकाची सर्वच ठिकाणी कमालीची चर्चा होत होती. ज्या क्षणाची आपण गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होतो. अखेर तो क्षण अगदीच जवळ आला आहे.

गेल्या ९९ दिवसांपासून आपण बिग बॉस मराठीचा खेळ मोठ्या आवडीने पाहत आलो आहोत. या सीजनमधील विजेत्याचं नाव समोर यायला आता फक्त अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. विजेत्या स्पर्धकाला या दिमाखदार सोहळ्यात ट्रॉफी दिली जाते.

बिग बॉसच्या चौथ्या सिझनचा विजेता कोण असणार याबद्दल सध्या सर्वत्र तर्क वितर्क लावले जात असतानाच खुद्द शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी आता विनर कोण असणार याबद्दल मोठी हिंट दिली आहे.

सध्या घरात एकूण पाच स्पर्धक आहेत. अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, किरण माने आणि राखी सावंत. या ग्रँड फिनाले शोचा सध्या प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात सर्व स्पर्धक आपल्या खास नृत्य शैलीने सोहळ्याला रंगत आणताना दिसणार आहेत.

सोशल मीडियावर शेअर करण्यात प्रोमोमध्ये महेश मांजरेकर म्हणतात, मित्रानो १०० दिवसांची चटरफटर आज संपणार आहे आणि अवघ्या काही तासांतच या सीझनचा विनर आपल्याला मिळणार आहे. या सिझनचा विनर मिळणार असं म्हणताच अपुर्वा नेमळेकर आपल्याला समोर दिसत आहे. त्यामुळे आता या सीझनची विनर अपूर्वा नेमळेकर असेल असा अंदाज सध्या प्रेक्षक सोशल मीडियावर लावत आहेत.

बिग बॉसच्या घरात अपूर्वा नेमळेकरनेच ट्रॉफी जिंकावी अशी चाहत्यांची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. अपूर्वाच्या समर्थनार्थ मुंबईतील अनेक नाक्यांवर तिचे बॅनर लावण्यात आले आहे. बिग बॉसच्या घरातील पहिली टॉप 5 मधील स्पर्धक अपुर्वा नेमळेकरच होती. अपूर्वा बिग बॉसच्या घरात तिकीट टू फिनाले मिळवून थेट टॉप 5 मध्ये गेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT